प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :
सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडून निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सतीश थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. उमेदवार व नागरिकांनी आदर्श
आचारसंहितेचे काटकोर पालन करून या निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ.कैलास चव्हाण केले.
नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या २३
जागांसाठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दि.१० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दि.१७
पर्यंत अखेरची मुदत असून, दि.१८ रोजी छाननी होणार आहे. तर दि २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत
आहे. दि. २६ नोव्हेंबरला चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान, नामनिर्देशन पत्र स्वीकारणे छाननी प्रक्रिया तसेच
मतमोजणी प्रक्रिया नगरपरिषदेच्या कार्यालयातच होणार असल्याचे डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे असून, मूळ प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे. अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागणार
शपथपत्र स्वयंघोषणा पत्र थकबाकी नसलेला दाखला
गुन्हेगारी नसलेला दाखला, जन्म तारखेचा पुरावा, मालमत्तेचे विवरण, शौचालय असल्याचा दाखला, नगरपंचायत ठेकेदार नसल्याचा दाखला, आधारकार्ड
पॅनकार्ड, निवडणूक खर्चासाठी बँकेचे खाते, आरक्षित
जागेसाठी जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र व ते नसल्यास वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची प्रत आदी कागदपत्रे जोडून उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले
सासवड शहरातील १३५ होर्डिंग्ज, फ्लेक्स काढले
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू केली असून
आचारसंहितेची अंमलबजावणी म्हणून शहरातील सुमारे १३५ होर्डिंग्ज, फ्लेक्स काढून टाकण्यात आले असून, नामफलक पाट्या, बोर्ड झाकण्यात आले आहेत. तसेच
उमेदवारांकडून आचारसंहिता काळात पत्रके वाटणे, भेटवस्तू वाटणे किंवा सोशल मीडियावर प्रसिद्धी करून प्रलोभने दाखवणे यावर निवडणूक यंत्रणेचे लक्ष असून त्यासाठी मीडिया सेलची नेमणूक करण्यात आलेली आहे.
असे प्रकार निदर्शनास आल्यास सबंधित उमेदवाराच्या खर्चामध्ये धरण्यात येणार असल्याचेही डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले

मुख्य संपादक – अझीम अत्तार

























