प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज : सासवड येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज कधी खंडित होईल आणि ती कधी येईल याचा नेमच नसल्याची
सासवडची स्थिती आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत लाईटीच्या समस्या बाबत विद्युत अधिकाऱ्यांना संपर्क केला त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही
सासवड व परिसरात महावितरणचे हजारो ग्राहक असून, कोट्यवधींचा महसूलही खात्याला या भागातून येतो. अशा स्थितीत येथील वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि चांगल्या
सेवेबद्दलच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हणणे येथील व्यापारी आणि काही ग्राहकांचे आहे. गेल्या २
दिवसांत येथील वीजपुरवठा इतका विस्कळित झालेला आहे की, वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा नेमच नाही

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















