प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: ढोल ताशांच्या गजर डीजे चा दणदणाटआकर्षक विद्युत रोषणाई हे सासवड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले
दुपारी बारा वाजता मानाच्या अमर गणेशोत्सव मंडळाच्या श्रीची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली सासवड शहरातील सर्व गणेश मंडळांच्या मिरवणुका
जयप्रकाश चौक अमर चौक नवजवान चौक या मार्गावरून पार पडल्या मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती नगरपालिकेने उभारलेल्या हौदामध्ये सर्व मुर्त्यांचे विसर्जन झाले
पोलिसांच्या चौक बंदोबस्तामुळे मिरवणूक शांततेत पार पडली भोर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी ७ पोलीस अधिकारी 55 पोलीस कर्मचारी २५ होमगार्ड यांचा ताफा तैनात होता

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















