प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज
पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन
सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्पलॉइज विंग (प्रोटन) संघटन मार्फत महाराष्ट्राचे 36 जिल्ह्यात 3 टप्प्यात सर्व तहसील अधिकारी कार्यालयासमोर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
अंगणवाडी सेविका, शिक्षक सेवक, विषयतज्ञ सी.एच.बी तत्त्वावरील प्राध्यापक यांच्या विविध समस्यांवर एकदिवशीय राष्ट्रीय धरणे आंदोलन करीत आहे.
शासन प्रशासन आणि न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न ही संघटना यशस्वीपणे सोडवीत आहे. सरकार एकीकडे कायदा दुरुस्ती करून सुद्धा अनेक कायदेशीर तरतुदी राखून ठेवते आणि दुसरीकडे त्यांच्या अंमलबजावणीसाठी दुर्लक्ष करून कर्मचाऱ्यांवर होत
असलेल्या अन्यायाचे निवारण करीत, एकीकडे कायद्याने बंधनकारक अटींवर शैक्षणिक व प्रशासकीय स्थरांवर सरकारचे दुर्लक्ष होऊन अन्यायकारक वागणूक मिळत आहे
तर अनिर्देशित न्यायप्रभूतेच्या नावाखाली टाळाटाळा करीत आहे. न्यायालयीन आदेशाच्या अधीन राहून निर्णय घेणे शक्य असतानाही सरकार अनेक प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्यायापासून वंचित ठेवत आहे. काही कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष न्यायनिवाडा झाला तरी समय सीमा अनुल्लेखामुळे अन्याय दूर केला जात नाही
म्हणूनच हे सार्वजनिक प्रश्न संघटनेने हाक देऊनही उपरोक्त हाक देऊनही उपरोक्त कारणांनी सरकारला अद्यापही सोडविता आलेले नाहीत. त्याचा निषेध व्यक्त करून
सरकारला जागे करण्यासाठी प्रोटॉन 22 मे रोजी तहसील/ जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे, 5 मे जून रोजी जिल्हास्तरीय धरणे आंदोलन व 5 जुलै रोजी “राज्य स्तरीय रॅली” यांनी असे तीन टप्प्यात राज्यव्यापी आंदोलन करणार निवेदनात म्हटले असल्याचे प्रोटॉनच्या राज्य संयोजक सुनिता कसबे यांनी सांगितले.
शिवसेना तालुकाप्रमुख उमेश गायकवाड, सिंगापूरचे उपसरपंच विक्रम पवार उपस्थित होते

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















