प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज सासवड शहरातील समाधीवाडा परिसरात गटारी उघड्या पडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या उघड्या गटारींमुळे
मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून सासवड नगरपालिकेने तातडीने पाहणी करून गटारींवर झाकणे बसवावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
समाधीवाडा परिसरात नागरिकांची तसेच लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, काही ठिकाणी गटारींची झाकणे तुटलेली अथवा गायब झाल्याने गटारी उघड्या पडल्या आहेत. रात्रीच्या वेळी या उघड्या गटारी
सहज लक्षात येत नसल्याने पादचारी, दुचाकीस्वार तसेच लहान मुलांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात या गटारींमध्ये पाणी साचल्यास उघड्या गटारींचा अंदाज येत नसल्याने दुर्घटनेची शक्यता अधिक वाढते. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची भावना आहे
सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समाधीवाडा परिसरातील उघड्या गटारींची पाहणी करून तातडीने गटारींवर मजबूत झाकणे बसविण्याच्या सूचना द्याव्यात
अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच शहरातील इतर भागांमध्येही अशा प्रकारे उघड्या गटारी आहेत का, याची पाहणी करून धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे
दुर्घटना घडण्याची वाट न पाहता नगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून उघड्या गटारींवर झाकणे बसवावीत, अशी मागणी समाधीवाडा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















