Homeक्राईमभिवडीतील मल्हार अ‍ॅक्वात वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई

भिवडीतील मल्हार अ‍ॅक्वात वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील मल्हार अ‍ॅक्वा या व्यावसायिक आस्थापनात वीजचोरी केल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा, २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीकांत मल्हारी गायकवाड (रा. भिवडी, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत महावितरणच्या बारामती भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रघुनाथ नाथ्याबा गोफणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार १० मार्च

२०२६ रोजी महावितरणच्या भरारी पथकाने संबंधित व्यावसायिक ठिकाणी वीजमीटर व वीजजोडणीची तपासणी केली. यावेळी पोलवरून येणाऱ्या इनकमिंग सर्व्हिस वायरमधून वीजमीटरपूर्वीच अनधिकृत टॅप घेऊन

२.५ चौ.मि.मी. निळ्या वायरच्या सहाय्याने थेट वीजपुरवठा करून वीजमीटरवर वापराची नोंद होणार नाही, अशी कायमस्वरूपी व्यवस्था केल्याचे निदर्शनास आले

तपासणीदरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून वीजमीटर, जोडणी व संपूर्ण ठिकाणाचे छायाचित्रण करण्यात आले. तसेच वीजचोरीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे तीन फूट लांबीची वायर जप्त करून सीलबंद

करण्यात आली.
महावितरणच्या नोंदीनुसार संबंधित ग्राहकाचा मंजूर वीजभार १ किलोवॅट असताना प्रत्यक्ष जोडलेला भार ३.६३ किलोवॅट आढळला. मागील १८ महिन्यांच्या तपासणीत

८,१६६ युनिटपैकी केवळ ३०७ युनिटचे बिल आकारण्यात आले असून उर्वरित ७,८६० युनिटच्या वापरामुळे सुमारे १ लाख ८१ हजार ६८६ रुपयांचे वीजचोरीचे मूल्यांकन करण्यात आले

या प्रकरणात संबंधित ग्राहकाने १३ मे २०२६ रोजी १ लाख ८३ हजार ५५० रुपये वीज बिलाची रक्कम भरल्याची नोंद आहे. मात्र, २० हजार रुपयांचे तडजोड शुल्क अद्याप

भरलेले नसल्याने महावितरणने कायदेशीर कारवाई करत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला

हा प्रकार २९ ऑगस्ट २०२४ ते १० मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचा संशय असून स्थळ तपासणी

अहवाल, पंचनामा, असेसमेंट शीट, वीजबिले, छायाचित्रे व जप्त मुद्देमाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधवर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!