प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:
पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील युवक ऋतुराज सुदर्शन चौंडकर (वय १९) याचा
सासवड–सुपा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे नायगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे
ऋतुराजने नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. शांत मनमिळावू, नम्र आणि कष्टाळू स्वभावामुळे तो मित्रपरिवारासह गावातील सर्वांचा लाडका होता.
प्रत्येकाशी आदराने व प्रेमाने वागणारा ऋतुराज सामाजिक उपक्रमांमध्येही उत्साहाने सहभागी होत असे. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आजी-आजोबा, आई-वडील, चुलते, चुलती, भाऊ असा परिवार आहे. नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष गिरीधर चौंडकर यांचा तो नातू
तर सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन चौंडकर यांचा मुलगा होता. ऋतुराजच्या निधनाबद्दल परिसरातील विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून चौंडकर कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















