Homeताज्या बातम्यानायगाव येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक युवकाचा जागीच मृत्यू

नायगाव येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक युवकाचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. ३ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी

जेजुरी पोलीस ठाण्यात फेटल मोटार अपघात रजिस्टर क्र. 06/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील कुलारी येथील रहिवासी

दुर्गेश ठाकूर (वय ३५) हे एमएच 12 एक्सडी 8867 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पारगाव मेमाणे येथून

नायगावच्या दिशेने जात होते. नायगाव गावाच्या हद्दीतील म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाली.

या भीषण अपघातात दुर्गेश ठाकूर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर समोरील अज्ञात मोटारसायकलवरील चालक गंभीर जखमी झाला

असून त्याला उपचारासाठी उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची खबर रुपेश मुन्ना ठाकूर (वय ३०, रा. कुलारी, ता. देवरी, जि. सागर, मध्य प्रदेश) यांनी दिली. त्यानुसार जेजुरी पोलीस ठाण्यात फेटल मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सदर प्रकरणात पोलीस हवालदार एस. बी. लोंढे यांनी नोंद केली असून सहाय्यक फौजदार कारंडे पुढील तपास करीत

आहेत. अपघाताचे नेमके कारण तसेच अज्ञात दुचाकी व तिच्या चालकाची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!