प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज:
सासवड भाजी मंडईत प्राचार्यांचा iPhone 15 Pro चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
सासवड ता. पुरंदर सासवड येथील भाजी मंडई परिसरात भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका प्राचार्यांचा महागडा
मोबाईल चोरीला गेल्याची घटना 15 जून 2026 रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात
अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी धनाजी अण्णासाहेब नागणे (वय 58 वर्षे) हे वृंदावन हाऊसिंग सोसायटी, जयदीप मंगल कार्यालयाजवळ सासवड येथे राहतात व प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 15 जून रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता ते पीएमटी स्टॉपजवळील सासवड भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते
त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल फोन चोरीला गेला.
भाजी खरेदीदरम्यान त्यांनी मोबाईल तपासला असता तो खिशात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र मोबाईल मिळून आला नाही. घरी परतल्यानंतर पत्नीच्या मोबाईलवरून स्वतःच्या
क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळले. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने मोबाईल चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
चोरीस गेलेला मोबाईल Apple कंपनीचा iPhone 15 Pro असून त्याची अंदाजे किंमत 50 हजार रुपये आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांकही पोलिसांकडे देण्यात आले आहेत.
या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक
265/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार जब्बार सय्यद करीत आहेत

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















