Homeताज्या बातम्यापुणे ग्रामीण एलसीबीचे दबंग अधिकारी पो .नि. अविनाश शिळीमकर यांना...

पुणे ग्रामीण एलसीबीचे दबंग अधिकारी पो .नि. अविनाश शिळीमकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर…

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येस

(२६ जानेवारी २०२६) उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .
अविनाश शिळीमकर यांचा जन्म तांबाड, गुंजन मावळ ता. भोर जि. पुणे येथील शेतकरी कुटुंबात झाला . त्यांचे

शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांबाड, भोर माध्यमिक शिक्षणअनंतराव थोपटे कॉलेज भोर उच्च शिक्षण B.Sc. एस.पी. कॉलेज पुणे येथे झाले . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पीएसआय परिक्षा
१९९३ साली पास झाले . त्यांनी आतापर्यत मुंबई शहर, सातारा, नागपूर शहर डिटेक्शन क्राईम ब्रांच, अहिल्यानगर विशेष शाखा, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा येथे नोकरी केली असून सध्या स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथे कार्यरत आहेत .

पोलीस उप निरीक्षक पदावर पुणे ग्रामीण जिल्हयात काम करत असताना ऊरूळी कांचन परिसरातील आप्पा लोंढे या कुख्यात गुन्हेगाराच्या कुख्यात टोळीस पायबंद घालून परिसरात गुन्हेगारीला प्रतिबंध केला आणि जनसामान्यात पोलीसांची प्रतिमा उंचावली होती .

सन २०१३ मध्ये नागपूर शहर आयुक्तालयाचे गुन्हे शाखा येथे कर्तव्य बजवित असताना, कुख्यात गुन्हेगारी टोळीचा प्रमुख आरोपी राजा गौस ऊर्फ गौस अली वल्द वारीस अली रा. मोठा ताजबाग यास व सदस्यांना गोरखनाथ उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेवून खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, चे एकूण ३८ गुन्हे उघडकीस आणले आहे

सन २०१४ मध्ये नागपूर शहरात खून, खूनाचा प्रयत्न खंडणी असे गुन्हे दाखल असणारी व प्रचंड प्रमाणात दहशत असणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचा म्होरक्या संतोष आंबेकर व सदस्यांना अटक करून अंबाझरी पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील दोन गुन्हे उघडकीस आणले तसेच टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल करून कुख्यात टोळीची दहशत संपुष्टात आणून नागपूर शहरात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात मोलाचे कार्य केले आहे

अहिल्यानगर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या जनावरे, शेती माल चोरी जात होता, सर्व तपास यंत्रणा हतबल होत असताना स्वतः फिल्डवर उतरून उल्लेखनीय कामगिरी करत सराईत टोळीचा माग काढून जनावर व शेती माल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून टोळीस जेरबंद करून शेतकऱ्यांची जनावरे, शेती माल हस्तगत करून तो शेतकऱ्यांना परत केला.

नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असून सन २०२२ चे अखेरीस दरोडयाचे गुन्हयांमध्ये वाढ झालेली होती, पुणे ग्रामीण जिल्हयात सक्रीय असणारे परंतु अहिल्यानगर जिल्हयात वास्तव्यास असणारे गुन्हेगारी टोळयांना जेरबंद करून पुणे ग्रामीण जिल्हयातील दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हे प्रतिबंध केला

त्यामुळे मालमत्ता चोरीचे गुन्हयात मोठ्ठया प्रमाणात घट झालेली आहे.
सेवा कालावधीत विविध पदांवर विविधी ठिकाणी कर्तव्य करताना गंभीर स्वरूपांच्या गुन्हयांचे तपासात, कायदा व सुव्यवस्था राखण्यात, प्रतिबंधात्मक कारवाई, विशेष मोहिमा तसेच दैनंदिन पोलीस कामकाजात त्यांनी उत्कृष्ट व व गुणवत्तापूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यामुळे

अनेक गंभीर प्रकरणांमध्ये लक्षणीय यश प्राप्त झाले असून पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यात मोलाचे योगदान लाभले आहे.
लोणंद पोलीस स्टेशन व शिरवळ पोलिस स्टेशन येथे सपोनि अविनाश शिळीमकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले होते .
यापुर्वी त्यांचा पोलीस महासंचालक पदक देवून 2024 साली गौरविण्यात आले होते

आज पर्यतची सेवा प्रशंसनीय व उल्लेखनीय असल्याने वरिष्ठ अधिकारी, सहकारी तसेच नागरीकांमध्ये त्यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे.
त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निलम गायकवाडचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या पुरंदर तालुक्यातील विविध पक्षांच्या...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर : माळशिरस येथील २१ वर्षीय तरुणी निलम महेंद्र गायकवाड हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची...

पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज आरे बापरे...पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे   पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील २२ वर्षीय तरुणीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक...

गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस...

Crime news:उरूळी कांचन पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी बंदुकीने फायरींग करून खुनाचा प्रयत्न करून फरारी असलेले...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : दि  ०४/०२/२०२६ रोजी सायंकाळी १९.३० वा. चे सुमारास नायगाव ता. हवेली जि. पूणे गावच्या हद्दीत, कबीर चायनिज हॉटेल येथे...

Crime news: जेजुरीत दुकानाची तोडफोड करून दहशत माजविणारे पाच आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी शहरात दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या मारहाण व दुकान तोडफोड प्रकरणातील पाच आरोपींना अखेर जेजुरी पोलीस स्टेशन...

error: Content is protected !!