प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज
सावधान! या कारणामुळे बोपदेव घाट उद्यापासून ७ दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे सावधान! या कारणामुळे बोपदेव घाट उद्यापासून ७ दिवस पूर्णपणे बंद
सासवड-कोंढवा रस्त्यावरील बोपदेव घाट ८ ते १४ जानेवारी दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे
घाटात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती व विस्तारीकरणाच्या
कामामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
कालावधी: ८ जानेवारी ते १४ जानेवारी २०२६.
स्थिती: एकेरी वाहतूकही बंद राहील; मार्ग पूर्णतः ठप्प
असेल.
परिणाम: पुरंदर, बारामती, इंदापूर आणि फलटणहून पुणे-मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत होणार.
पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी दिवे घाट किंवा नारायणपूर मार्गे चिव्हेवाडी घाटाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता देवेन मोरे यांनी केले आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















