प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड परिषदेच्या नगराध्यक्षपदासह २० नगरसेवकांच्या जागांसाठी मंगळवारी (दि. २) मतदान पार पडले. या वेळी शहरातील ६७.०२
टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
सासवड नागरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १६ हजार ८१८
पुरुष व १६ हजार ८३८ महिला असे मिळून एकूण ३३ हजार ६५६ मतदार आहेत. त्यापैकी एकूण २२ हजार ५५७ मतदारांनी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५.३०
वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. याबबात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सतीश थेटे यांनी माहिती दिली
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मतमोजणीची
उत्सुकता उमेदवारांना कार्यकर्त्यांना होती मात्र ही मतमोजणीच पुढे ढकलल्याने उमेदवारांना आणखी २० दिवस म्हणजे दि. २१ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक
वाढली आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार

























