प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज या परीसरात रस्त्यावरचं रिक्षा थांबल्यामुळे होतीयं प्रचंड वाहतूक कोंडी पोलिसांचे दुर्लक्ष
विद्यार्थी नोकरवर्ग व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सासवड हिवरे रोडवर पीएमटी बस थांबा बनलाय रिक्षा चालकांचा अड्डा
रिक्षा चालकांनी अनधिकृत थांबा निर्माण केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे सकाळी ७:३० वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थी कामगार नोकरदार यांची
एकाच वेळी बसथांब्यावर गर्दी झालेली असते. प्रत्येकाला
बस पकडण्याची घाई असताना याठिकाणी रिक्षाचालक प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत
बसथांब्यांवर रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे बसचालकांना
रस्त्यावरच बसेस उभ्या करून प्रवासी घ्यावे लागतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा
लागलेल्या असतात. त्यातच शालेय बसेस विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा
लागतो. वाहतुकीचा या चौकात अक्षरश: श्वास कोंडतो; मात्र पोलिस चौकीतील कर्मचारी कधीही स्वत:हून रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न करताना दिसत नाहीत

मुख्य संपादक – अझीम अत्तार

























