प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज
Crime news: सासवड शहरात किरकोळ भांडणातून धारदार हत्याराने खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सासवड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलीसांची कामागिरी
सासवड पोलीस ठाणे गु.र.नं. ४७१/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे दि. ०९/१२/२०२५ रोजी दाखल आहे. सदर गुन्हयातील मयत नामे राजू दत्तात्रय बोराडे वय ३८ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, सासवड ता. पुरंदर जि पुणे यांचा दि.०९/१२/२०२५ रोजी सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सचे मागील बाजूस घाटे यांचे बांधकाम सुरू
असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर जिन्याखाली मृतदेह
मिळून आला होता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन धारदार शस्त्राने मयताचे गळ्यावर वार करुन खून केला आहे. सदर प्रकरणी मयताचा भाऊ गजानन दत्तात्रय बोराडे वय ३३ वर्षे रा. हिवरकर मळा, सासवड ता. पुरंदर जि पुणे यांनी वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या, सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सासवड पोलीस स्टेशन कडील पथकांनी एकत्रित सुरू केला. घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले मयताची माहिती घेण्यता आली असता मयत राजू दत्तात्रय बोराडे
यास दारु पिण्याचे व्यसन असून तो आक्रमक स्वभावाचा असल्याने त्याचे अनेक लोकांशी वाद होते घटना घडले ठिकाण व सासवड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पथकांनी तपासत असताना दोन संशयित इसम मयत
याचेसोबत घटनास्थळाकडे जात असताना दिसून आले. सदर इसमांचे फुटेज व फोटो डेव्हलप करुन त्याबाबत पुढे तपास सुरु केला. सदर संशयित इसमांचा शोध घेणेकामी पुणे शहर हददीत कोंढवा, हडपसर या भागात तपास पथके रवाना करण्यात आली होती. तसेच सदर आरोपीचे फोटो
घटनास्थळाचे आजूबाजूचे लोकांना मजुर, ठेकेदार, सासवड शहरातील जास्तीत जास्त लोकांना दाखवून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालू होता
त्याअनुषंगाने तपास पथके सासवड परिसरात संशयित आरोपी यांचा शोध घेत असताना आनंद वाईन्स सासवड येथे एक संशयित इसम दारू विकत घेण्यासाठी येताना तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय चिले यांचे
निर्देशनास पडला त्याचे वर्णन गुन्हयातील संशयितांचे वर्णनाशी जुळत होते, त्यामुळे त्याचेकडे चौकशी केली
असता त्याने त्याचे नाव सुरज प्रकाश बलराम निषाद वय ३४ वर्ष, धंदा बांधकाम मजुर, रा. मंगलोर, पो. पतोरा, छत्तीस गड असे सांगितले चौकशी दरम्यान त्याची हालचाल व उत्तरे संशयित-विसंगत होती त्यामुळे त्यास सासवड
पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी करणेत आली. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार नीरज ओम प्रकाश गोस्वामी वय २५ वर्षे व्यवसाय बांधकाम मजूर रा.गोल पडीया, जिल्हा ग्वाल्हेर, मध्यप्रदेश याचे सोबत केल्याचे कबुल केले. त्या आधारे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले.
आरोपी १) सुरज प्रकाश बलराम निषाद वय. ३४ वर्ष, धंदा बांधकाम मजुर, रा. मंगलोर, पो. पतोरा, छत्तीस गड २) नीरज ओम प्रकाश गोस्वामी वय २५ वर्षे व्यवसाय बांधकाम मजुर रा.गोल पडीया, जिल्हा ग्वाल्हेर, मध्यप्रदेश यांचे कडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता मयत व
आरोपी हे एकमेकांचे परिचयाचे नव्हते, परंतू घटनेच्या दिवशी सोमवार दि.०८/१२/२०२५ रोजी यातील दोन्ही
आरोपी दारु पित असताना यातील मयत त्यांचे जवळ गेला व दारु पिण्यावरुन त्यांचेत वाद झाला. त्यामध्ये यातील मयताने आरोपीत यांना चाकूचा धाक दाखवून धमकी दिली यावरुन सदर दोन्ही आरोपीत यांनी मयतास दारु पाजून त्यास घटनास्थळावर घेवून जावून त्याचेकडीलच चाकू घेवून त्याचा चाकूने वार करुन खून केला असल्याची कबुली दिली आहे.
तसेच यातील आरोपी नामे नीरज ओम प्रकाश गोस्वामी वय. २५ व्यवसाय चांधकाम मजूर रा.गोल पडीया, जिल्हा ग्वाल्हे, मध्यप्रदेश याने जामखेड येथील विकास मधुकर अंधारे वय २२ याचा पैशाचे वादातून किरकोळ भांडणातून
खून केल्याची कबूलो दिली आहे. त्याबाबत जामखेड पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे अकस्मात मयत रजि.नं.८१/२०२५ दि.२४/११/२०२५ रोजी दाखल आहे. सदर दोन्ही आरोपी हे १०-१२ दिवसांपूर्वीच सासवड येथे कामासाठी आले होते. आरोपीची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेणे अतिशय आव्हानात्मक होते, सदरचे आव्हान
सासवड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी स्विकारून सलग ७ दिवस परिश्रम घेवून संशयित आरोपीचा ठिकठिकाणी शोध घेतला आणि स्विकारलेले
आव्हान पुर्ण करत दोन आरोपींना जेरबंद करणेत तपास पथकांना यश आले आहे. आरोपींकडून वरील दोन्ही खूनाच्या घटनांचा उलगडा झालेला आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दि. १९/१२/२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार
बारामती विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सासवड पोलीस स्टेशनचे
पो.नि. कुमार कदम, सपोनि वैभव सोनवणे, पोसई परमेश्वर गोडसे, पोसई अर्जुन चोरगे, पोसई नारायण खंडागळे अंमलदार सुरज नांगरे, जब्बार सय्यद, सुहास लाटणे शरद
जाधवर गोकुळ हिप्परकर, प्रणय मखरे अक्षय चिले, सचिन किवळे, स्थानिक गुन्हे शाखेकडोल सपोनि दत्तात्रय मोहिते, पोसई बाळासाहेब कारंडे अंमलदार अमोल शेडगे मंगेश
भगत, धीरज जाधव यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे हे करत आहेत.

मुख्य संपादक – अझीम अत्तार

























