प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा
गाठत शहरासाठी ८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतून गोदाजीराजे जगताप पुतळा ते जगताप हॉस्पिटल या मार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन गुरुवार (ता. ३० जुलै) रोजी उत्साहात पार पडले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण झाल्यानंतर नागरिकांना अधिक सुरक्षित
दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेना पक्षाचे गटनेते मंदार गिरमे
नगरसेवक बाळासाहेब भिंताडे राजाभाऊ टकले, प्रीतम म्हेत्रे सचिन भोंडे, अक्षराज जगताप तेजस राऊत, सौरभ
म्हेत्रे, संदीप जगताप, श्रीकांत (पप्पू) टिळेकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी सासवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. शहरातील रस्त्यांचे
आधुनिकीकरण, वाहतूक सुलभता आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सुधारणा होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शिवसेना सासवड शहरप्रमुख मिलिंद इनामके यांनी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विजय शिवतारे यांनी सासवडच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरवासीयांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















