Homeक्राईमसैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक

विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी काही दिवसांतच या घरफोडीचा उलगडा केला. आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे १ लाख ८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड-हिवरे मार्गावरील दत्तनगर परिसरातील सैनिक कॅन्टीनमध्ये २० जुलैच्या रात्री ते २१ जुलैच्या पहाटे दरम्यान ही चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने कॅन्टीनच्या छतावरील पत्रे काढून, साडीच्या साहाय्याने इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर विविध प्रकारचे कपडे, शालेय बॅग, रे-बॅन गॉगल्स, किराणा साहित्य, खाद्यतेल, ड्रायफ्रूट्स, तांदूळ, साबण, बिस्किटे तसेच सौंदर्यप्रसाधने असा मोठ्या प्रमाणावर माल चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी कॅन्टीनचे प्रतिनिधी शरद विश्वनाथ यादव यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती

गुन्ह्याचा तपास सुरू असताना एलसीबीच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्याचबरोबर तांत्रिक तपास आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित उमेश गोसावी याला जेजुरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला

तपासादरम्यान आरोपी हा मूळ कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रहिवासी असून सध्या जेजुरी येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले. तसेच त्याच्याविरुद्ध सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील

विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती

पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाली आहे. त्यामुळे त्याच्या इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू असून आणखी काही प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत अल्पावधीत गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!