प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सासवड शहरातील शिवतीर्थ चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजबांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या
कार्याचा गौरव करत त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांचा वारसा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला आपल्या लेखणीतून व शाहिरीतून हक्काचा आवाज देण्याचे महान कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी आपल्या ओजस्वी शाहिरीच्या माध्यमातून जनजागृती करून महाराष्ट्राच्या अस्मितेला बळ दिले, असे यावेळी नमूद करण्यात आले.
समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्याय ही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची मूलतत्त्वे असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजातील प्रत्येक घटकाच्या सन्मानासाठी
व सर्वसमावेशक विकासासाठी कार्य करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमास भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे पुणे
जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे, सासवड शहराध्यक्ष
आनंद जगताप, जिल्हा उपाध्यक्ष साकेत जगताप, हनुमंत
साळुंखे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















