Homeक्राईमसासवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त एका...

सासवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त एका आरोपीला अटक दोन फरार

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: सासवड शहरात अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची धडक कारवाई

११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एका आरोपीला अटक दोन फरार

सासवड, ता. ३१ : सासवड–कोंढवा रस्त्यावरील सुप्रभा कंपनीजवळ सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यावर पुरंदर तहसील कार्यालयाच्या नागरी पुरवठा विभाग आणि सासवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ११ लाख ६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या

प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत

याप्रकरणी पुरंदर तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी (पुरवठा) गोपाल वासुदेव ठाकरे (वय ३७, रा. सासवड) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

आहे. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, ३५ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी श्रवणकुमार बाबुराव बिस्नोई (मूळ रा. राजस्थान) याला अटक केली असून राकेशकुमार प्रधान धारा तसेच त्यांचा एक अनोळखी साथीदार फरार असून, दोघांचा शोध सुरू आहे.

३० जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सासवड–कोंढवा रस्त्यावरील सुप्रभा कंपनीपासून सुमारे

१०० मीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) यांची कोणतीही परवानगी न घेता विविध गॅस कंपन्यांच्या सिलिंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अशा प्रकारे गॅसची बेकायदेशीर हाताळणी करून स्वतःच्या तसेच नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करण्यात आला होता.

कारवाईदरम्यान पोलिसांनी महिंद्रा कंपनीचे भारत गॅसचे तीनचाकी वाहन (एमएच-१२-एमपी-६२५४), मारुती सुझुकी छोटा हत्ती वाहन (एमएच-१२-एक्स-११५६), ५८ भरलेले व्यावसायिक गॅस सिलिंडर, ४९ रिकामे व्यावसायिक गॅस सिलिंडर, ९ रिकामे घरगुती गॅस सिलिंडर

इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारा लोखंडी पाईप असा एकूण ११,०६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!