Homeक्राईमजेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत दोन भामट्यांनी केला विश्वासघात जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल ..

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या

दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार (दि. १८ जुलै) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात दोन अज्ञात

व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुसुम प्रकाश भुजबळ (वय ६५, रा. जेजुरी, विद्यानगर, मूळ रा. दौंडज, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुम भुजबळ या जेजुरी गावच्या हद्दीत

शिवानंद हॉटेलजवळ प्रकाश झगडे यांच्या मालकीची टपरी चालवितात. त्या टपरीवर बसलेल्या असताना दोन अनोळखी इसम तेथे आले. परिसरात सोन्याचे दागिने चोरणारे लोक फिरत असल्याचे सांगून त्यांनी भुजबळ यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, तुमचे सोन्याचे दागिने

रुमालात गुंडाळून देतो असे सांगत या दोघांनी हातचलाखीने भुजबळ यांच्या कानातील सोन्याची फुले व गळ्यातील सोन्याची पोत काढून घेतली. त्यानंतर सोन्याचे दागिने असल्याचा भास निर्माण करून रिकामा रुमाल गुंडाळून त्यांच्या हातात दिला आणि तेथून पसार झाले

काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भुजबळ यांनी पोलिसांत धाव घेतली. चोरून नेलेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे २४ हजार रुपये किमतीची ४ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले आणि १८ हजार रुपये

किमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल

करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मपोसई पवार करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!