Homeक्राईमसासवड पोलिसांचा मध्यरात्री हुक्का पार्लरवर छापा 26 हजारांचा मुद्देमाल जप्त दोघांविरुद्ध गुन्हा..

सासवड पोलिसांचा मध्यरात्री हुक्का पार्लरवर छापा 26 हजारांचा मुद्देमाल जप्त दोघांविरुद्ध गुन्हा..

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज

सासवड पोलिसांचा मध्यरात्री हुक्का पार्लरवर छापा 26 हजारांचा मुद्देमाल जप्त दोघांविरुद्ध गुन्हा

सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आस्करवाडी येथे सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सासवड पोलिसांनी

मध्यरात्री धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत 26 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, 2018 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 27 जून 2026 रोजी रात्री 12.01 वाजण्याच्या सुमारास मौजे आस्करवाडी (ता. पुरंदर) येथील हॉटेल कसोल कॅफे येथे छापा

टाकण्यात आला. त्यावेळी अभिजीत गणेश कामठे (वय 23, रा. चांबळी, ता. पुरंदर) आणि प्रज्योत अशोक चोरगे (वय 26, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) हे ग्राहकांना बेकायदेशीररीत्या हुक्का उपलब्ध करून देत हुक्का पार्लर चालवत असल्याचे निदर्शनास आले

या कारवाईदरम्यान पोलिसांनी हुक्का साहित्य व इतर मिळून 26,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस शिपाई तुषार बाळू लोंढे यांनी दिलेल्या

फिर्यादीवरून सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 294/2026 अन्वये सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, 2018 च्या कलम 4-अ व 21-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार होळकर करत असून, गुन्ह्याची नोंद सहाय्यक फौजदार जाधव यांनी केली आहे.

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांची स्पष्ट भूमिका

याबाबत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले की

“सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकही अवैध हुक्का पार्लर चालू देणार नाही. अशा प्रकारचे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती नागरिकांनी तात्काळ सासवड पोलीस

स्टेशनला द्यावी. माहिती मिळताच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अवैध व्यवसायांना कोणतीही पाठीशी घालण्यात येणार नाही.

सासवड पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध हुक्का पार्लर चालकांमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळात अशा व्यवसायांवर आणखी कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!