Homeक्राईमसासवड पोलीसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई दोन ठिकाणी छापे लाखोंचा मुद्देमाल...

सासवड पोलीसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई दोन ठिकाणी छापे लाखोंचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड पोलीसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई  दोन ठिकाणी छापे लाखोंचा मुद्देमाल जप्त
सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगार व्यवसायाविरोधात मोठी मोहीम राबवत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण १८ जणांविरुद्ध

गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत रोख रक्कम आणि इतर मुद्देमालासह एकूण सुमारे ४.८५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
वनपुरी येथे जुगार अड्ड्यावर छापा
दि. १६ जून २०२६ रोजी दुपारी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना गोपनीय माहिती

मिळाली की, मौजे वनपुरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील शंभूराजे चौक परिसरातील एका हॉटेलच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने घटनास्थळी छापा टाकला

छाप्यात सहा जण जुगार खेळताना आढळून आले. त्यामध्ये अड्डा चालकासह इतर आरोपींचा समावेश असून पोलिसांनी रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण २१ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी

सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६७/२०२६ नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ४, ५ व ६ अन्वये कारवाई करण्यात

आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार लाटणे करीत आहेत.
झेंडेवाडीतील हॉटेलवर दुसरी मोठी कारवाई
याच दिवशी सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार

मौजे झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील एका हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना

मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित हॉटेलवर धाड टाकली.
कारवाईदरम्यान अड्डा चालकासह १२ जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून एकूण ४ लाख ६३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल

जप्त केला. या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २६८/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ४, ५ व ६ अंतर्गत

गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही दोन्ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी

राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव, श्रीराम पालवे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!