Homeक्राईमक्राईम न्यूज : पोलिसांनी तब्बल इतक्या घरफोड्या करणाऱ्या केली अटक....

क्राईम न्यूज : पोलिसांनी तब्बल इतक्या घरफोड्या करणाऱ्या केली अटक….

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  :

जुन्नर आणि नारायणगाव येथे घरफोडी करून फरार झालेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव

पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अटक केली

आरोपीकडून तीन घरफोडीतील १६ तोळे सोन्याचे, ८४१

ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी असा एकूण १४ लाख ३७हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विशाल दत्तात्रय तांदळे (वय २८ सध्या रा. मंचर ता. आंबेगाव, मूळ रा. पाटेगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान

पाटबंधारे विभागातील निवृत्त विष्णू भागूजी सांगडे (वय ६२ रा. वैभवलक्ष्मी सोसायटी, विटेमळा, नारायणगाव ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, सांगडेंनी

दिवाळीसाठी बँकेतील दागिने घरी आणून कपाटात ठेवले होते. ते १४ ऑक्टोबरच्या पहाटे हे कुटुंब नारायणगावचे

ग्रामदैवत मुक्ताबाई देवीच्या काकड आरतीसाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने कुलूप तोडून घरातील सोने, चांदीचे

दागिने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे

चोराच्या दुचाकीचा माग काढला. त्या आधारे तांदळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने नारायणगाव येथे जुन्नर परिसरात तीन

घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याकडून या तीन घरफोड्यांतील १४ लाख ३७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे

पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पो स्टे चे सपोनि प्रविण सांग स्था.गु.शा.चे सपोनि महोदव शेलार

पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीन संदिप वारे अक्षय नवले, नारायणगाव पो स्टे चे पोसई सोमश्वर शेटे

पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके निलेश जाधव यांनी केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!