प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज
पुरंदर तालुक्यामधील धोकादायक इसम एम पी डि ए कायदयांतर्गत कारागृहात स्थानबध्द
संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण हे पुणे ग्रामीण जिल्हयात सध्या चालु असलेल्या जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुका २०२५-२०२६ व आगामी
ग्रामपंचायत निवडणुक या स्थानिक स्वराज्य निवडणुका या शांततेत व भयमुक्त वातावरणात निर्वघ्णपणे पार पडाव्यात यासाठी जिल्हयामधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, तसेच अवैध शस्त्र बाळगणे, अवैध घातक हत्यारे बाळगणारे
अवैध वाळु व्यवसाय करणारे, अवैध व्यवसायातुन मिळविलेल्या आर्थिक प्राप्तीमधुन दहशत निर्माण करणारे, व त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरणारे धोकादायक व्यक्ती यांचे विरुध्द विशेष मोहिम राबवित
आहेत. पुणे ग्रामीण जिल्हयाचे हददीमधील गुन्हेगारी मोडीत काढणेसाठी दरोडा, जबरी चोरी, हायवे रोडवरील लुटमारी करणारे, व्यावसायीकांकडे खंडणीची मागणी करणारे, खुनाचा प्रयत्न करणारे, अवैधपणे अग्नीशस्त्रे
बाळगणारे, धोकादायक व्यक्ती यांचे विरुध्द कारवाईचा बडगा उगारुन एम.पी.डि.ए कायदयांतर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश पुणे ग्रामीण जिल्हयामधील पोलीस स्टेशनला दिलेले आहेत.
त्याप्रमाणे जेजुरी पोलीस स्टेशन हददीमधील ता. पुरंदर जि.पुणे येथे वास्तव्यास असलेला धोकादायक इसम नामे प्रशांत रमेश राणे वय वर्षे २६ रा. जवळार्जुन ता. पुरंदर जि. पुणे यांचे विरुध्द यापुर्वी बेकायदेशीपणे दारुचा गुत्ता
चालवुन विक्री करणे असे ५ गुन्हे दाखल होते. त्यामधुन मिळविलेल्या आर्थिक स्त्रोतचा वापर करुन त्याने भारतीय दंड विधान प्रकरण 16, तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे प्रकरण 17 व भारतीय हत्यार कायदा 1959 चे
प्रकरण 5 मध्ये नमुद केलेप्रमाणे बेकायदेशीर जमाव जमवुन आपखुशीने दुखापत करुन महिलेचा विनयभंग करणे, अवैध अग्नीशस्त्राचा वापर करुन खंडणीसाठी क्षती पोहचविण्याची भिती घालणे असे अशा प्रकारचे २ गंभीर गुन्हे दाखल होते. तो सराईत धोकादायक असल्याने
त्याचेविरुध्द एम पी डि ए कायदयांतर्गत कार्यवाही होणेकामी दिपक वाकचौरे सहायक पोलीस निरीक्षक जेजुरी पो स्टे यांनी संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक
पुणे ग्रामीण यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन मा. पोलीस अधीक्षक साो, पुणे ग्रामीण यांनी करुन तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करीता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला होता.
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी साो, यांनी इसम नामे प्रशांत रमेश राणे वय वर्षे २६ रा. जवळार्जुन ता. पुरंदर जि.पुणे वाला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारची कृत्ये करण्यापासुन प्रतिबंध करण्याचे दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपटटी गुंड
हातभटटीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणा-या, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालवणा-या आणि मानवी
अपव्यापार करणा-या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत मुख्य अधिनियम १९८१ चा (सुधारणा अधिनियम सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक २९) अन्वये आदेश पगम/एम पी डि ए/एस आर/०३/०१/२०२६ दिनांक २७/०१/२०२६ अन्वये स्थानबध्द करण्याचा आदेश पारीत केला आहे.
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी साो यांचे स्थानबध्दतेचे आदेशान्वये इसम नामे प्रशांत रमेश राणे वय वर्षे २६ रा. जवळार्जुन ता. पुरंदर जि.पुणे यास जेजुरी पोलीस स्टेशकडील सहायक
पोलीस निरीक्षक श्री. दिपक वाकचौरे, यांनी जेजुरी पोलीस
स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांचे मदतीने शोध घेवुन त्यास दिनांक ३०/०१/२०२६ रोजी ताब्यात घेवुन मध्यवर्ती कारागृह, अकोला येथे दाखल करुन स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी हि संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक
बारामती विभाग, पुणे ग्रामीण राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर उपविभाग सासवड, यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, सहायक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, जेजुरी पोलीस स्टेशन श्रेणी
पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पो हवा गणेश धनवे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पो.हवा विठठल कदम, पो. कॉ प्रसाद कोळेकर, मारुती करडे जेजुरी पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार

























