Homeक्राईमअवैध गावठी पिस्तुल बाळगणा-या तीन आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या दोन गावठी...

अवैध गावठी पिस्तुल बाळगणा-या तीन आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या दोन गावठी पिस्तुल व सहा जिवंत काडतुसे हस्तगत शिरूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : दिनांक १४/०३/२०२६ रोजी पोलीस अंमलदार नितेश थोरात, पोलीस अंमलदार सचिन

भोई हे शिरूर शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमदार नितेश थोरात यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार इसम नामे

नवनाथ गोरडे रा शिर्डी अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह दुचाकीवरून अहिल्यानगर पुणे हायवे रोडने तोंडाला रूमाल बांधुन शिरूर येथे येत असुन त्याचेजवळ बेकायदेशिर गावठी पिस्तुल बाळगुन आहे.

पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी लागलीच सदर माहीती ही पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे यांना कळवुन

त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, सचिन भोई, अजय पाटील, दादाराव नागरे यांनी सतरा कमान
शिरूर येथे अहिल्यानगर पुणे रोडवर सापळा लावला.

त्यावेळी बातमी मिळालेल्या प्रमाणे मोटारसायल आली असता ती भरधाव वेगात पुणे बाजुकडे हायवे रोडने गेली असता पोलीस पथकाने त्या मोटारसायकलचा पाठलाग करत असताना द नाना स्पॉट डोगंराजवळ मोटारसायकल ही खाजगी वाहनास धडकुन पडल्याने त्यावरील मागे

बसलेला इसम हा नाना स्पॉट डोगंराचे दिशेने पळुन गेला. मोटासायकल जवळ असलेल्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारात त्याने त्याचे नाव नवनाथ साहेबराव गोर्डे वय ३८ वर्ष, रा पोहेगाव खुर्द, ता कोपरगाव जि अहिल्यानगर असे सांगितले. त्यावेळी सदर इसमाची झडती घेतली असता

त्याचे कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल व मॅगझिनमध्ये पाच जिवंत काडतुसे मिळुन आली आहेत. तसेच सदरचा गावठी बनावटीचा पिस्तुल नवनाथ गोर्डे याने सागर बनसोडे रा. राहता अहिल्यानगर याचेकडुन विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरबाबत शिरूर पोलीस

स्टेशन येथे पोलीस अंमलदार नितेश थोरात यांनी फिर्याद दिलेली असुन त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २२१/२०२६ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन

गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री शुभम चव्हाण करीत असुन आरोपीतास मा. न्यायालया समक्ष हजर केले असता दिनांक १७/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. शिरूर पोलीस स्टेशनने दोन दिवसांमध्ये केलेल्या कारवाई मध्ये दोन गावठी बनावटीचे

अवैध पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक फोर्ड फिगो कार, एक पल्सर मोटारसायकल असा एकुण ३,४५,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन तीन आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस

अधिकारी प्रशांत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग शुभम चव्हाण पोलीस हवालदार विशाल कोथळकर अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार

नितेश थोरात, सचिन भोई, सुशिल सुरवसे, अंबादास थोरे, अजय पाटील, दादाराव नागरे, संदिप खेडकर, सागर बोराडे, विजय शिंदे निखिल रावडे रविंद्र काळे, निरज पिसाळ यांचे पोलीस पथकाने केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची धडक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज 28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची सर्वात मोठी  धडक कारवाई पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक...

दिवे घाट व सासवड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयते नाचवणाऱ्या बुलेटस्वारांवर ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : दिवे घाट, पालखी महामार्ग बायपास आणि सासवड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयते नाचवत गाड्यांचे सायलेन्सर फटाक्यांसारखे वाजवत आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत...

मद्यधुंद कार चालकाची दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दोन...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज मद्यधुंद कारचालकांने दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत फिर्यादी - प्रकाश राजाराम काकडे वय...

शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निवड

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील  शिक्षक शिवहार लहाने यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक...

error: Content is protected !!