Homeक्राईमCrime news:उरूळी कांचन पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी बंदुकीने फायरींग करून खुनाचा प्रयत्न करून...

Crime news:उरूळी कांचन पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी बंदुकीने फायरींग करून खुनाचा प्रयत्न करून फरारी असलेले दोन आरोपी दोन गावठी अग्नीशस्त्रासह जेरबंद…

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : दि  ०४/०२/२०२६ रोजी सायंकाळी १९.३० वा. चे सुमारास नायगाव ता. हवेली जि. पूणे गावच्या हद्दीत, कबीर चायनिज हॉटेल येथे यातील फिर्यादी मिलींद बाप्पू शेलार, वय ३८ वर्षे, रा. नायगाव ता.

हवेली जि. पूणे हे हॉटेलमध्ये असताना एका युनिकॉर्न मोटारसायकल वरून ३ अनोळखी इसम येवून त्यातील दोन इसम रोडचे कडेला गाडीजवळ थांबून व एक इसम

हॉटेलमध्ये येवून फिर्यादीस पाण्याची बॉटल मागून फिर्यादी पाण्याची बॉटल घेण्यासाठी वाकले असताना सदर इसमाने त्याचे गावठी पिस्टल काढून फायरींग करून फिर्यादीस

जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. वगैरे फिर्यादी यांचे मजकुरावरून दिनांक १२/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासासाठी उरुळीकांचन पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची एकूण दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती. तपास पथकांनी तपासादरम्यान अनेक सी.सी.टी.व्हि. कॅमेरे तपासून सदरची घटना करणारे तीनही आरोपींची नावे निष्पन्न

करून यातील आरोपी नवनाथ आनंदा घुले, वय २८ वर्षे, रा. दहीटणे ता. दौंड जि.पुणे यास दि. १३/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच यामध्ये एक

विधीसंघर्षीत बालक असून यास मा. पिठसीन अधिकारी यांचेसमोर हजर करणेत आले आहे. यातील अटक आरोपी याने सदरचा गुन्हा संग्राम हूलगे याचे सोबत सिध्दार्थ कांबळे याचे सांगणेवरून केला असलेबाबत सांगीतलेने यामध्ये

सिध्दार्थ कांबळे याचा समावेश होता हे सिध्द झाले होते.

यानंतर सदर गुन्हयातील आरोपी संग्राम हरीशचंद्र हुलगे, वय २० वर्षे, रा. महात्मा गांधी रोड, उरूळीकांचन ता. हवेली जि. पूणे व सिध्दार्थ गोविंद कांबळे, वय २८ वर्षे, रा. कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पूणे हे दोघे गुन्हा घडलेपासून

फरार झाले होते. सदर दोन्ही आरोपींचे शोधात असलेली तपास पथके यांनी वेगवेगळया ठिकाणी जावून गोपणीय बातमीदारांमार्फत माहीती घेवून तसेच तांत्रीक विश्लेषनाव्दारे तपास केला असता सदरचे दोन्ही फरार

आरोपी नाशिक या ठिकाणी असलेबाबत माहीती प्राप्त झाल्यानंतर त्यांना उरूळी कांचन पोलीस स्टेशन व स्था.गू.शाखा पूणे ग्रामीण यांचे पथकाने ताब्यात घेण्यात आले आहे.

तपासात असे निष्पन्न झाले आहे की, फियादी इसम व आरोपी सिध्दार्थ गोविंद कांबळे यांच्यात यापूर्वी जमीनीचा वाद आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, अटक आरोपी यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी

रिमांड घेऊन अधिक सखोल तपास करण्यात येत आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग गणेश बिरादार उप विभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, पोलीस निरीक्षक सचिन

वांगडे, उरूळी कांचन पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे मीरा मटाले, उरूळी काचंन पोलीस स्टेशन, पो. हवा. योगेश नागरगोजे, राजु मोमिन, भारत मोहोळ स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस हवा

सचिन जगताप, प्रविण चौधर निलेश जाधव, प्रशांत पवार, अजित काळे, पो. कॉ. सुमित वाघ, सोमनाथ सुपेकर उरुळी कांचन पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!