Homeक्राईमगोपनीय माहितीवरून सासवड पोलिसांचा मटका अड्ड्यावर धाडसी छापा २२ हजारांहून अधिक मुद्देमाल...

गोपनीय माहितीवरून सासवड पोलिसांचा मटका अड्ड्यावर धाडसी छापा २२ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त चौघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज: सासवड  दि. 20 जून 2026 : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध

धंद्यांना आळा घालण्यासाठी सासवड पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा धडक कारवाई करत मटका जुगाराच्या अड्ड्यावर

छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण २२ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

करण्यात आला असून चौघांविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सासवड शहरातील श्रीनाथ बारच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये

काही जणांकडून पैसे घेऊन मटका जुगार चालविला जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घोळवे यांनी तातडीने विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव

पोलीस हवालदार समर बनसोडे  पोलीस शिपाई सचिन किवळे व इतर कर्मचाऱ्यांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.

दुपारी साडे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकताच तेथे मटका जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळ

काढला मात्र जुगाराची नोंद ठेवणारे तीन जण पोलिसांच्या हाती लागले.

या कारवाईत सलीम रशीद शेख (रा. म्हाडा कॉलनी, सासवड)शैलेष रामा सुतकर (रा. दांडेकर पूल, पुणे) आणि ज्ञानोबा दत्तु तुपारे (रा. गोकुळनगर, कात्रज) यांना ताब्यात

घेण्यात आले.चौकशीदरम्यान त्यांनी या मटका व्यवसायाचा सूत्रधार सागर शामराव जगताप (रा. कोडीत नाका सासवड) असल्याची माहिती पोलिसांना दिली

पोलिसांनी घटनास्थळावरून २२ हजार ५४० रुपयांची रोख रक्कम, मटका नोंदीसाठी वापरण्यात येणारी दहा बुक्स आणि तीन पेन असा एकूण २२ हजार ६७० रुपयांचा

मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध भा.न्या.सं.का. कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची फिर्याद पोलीस शिपाई अक्षय शंकर चिले यांनी दिली असून गुन्ह्याची नोंद सासवड पोलीस ठाण्यात

करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेमुळे घोळवे यांचे कौतुक
गेल्या काही महिन्यांपासून सासवड शहर व पुरंदर

तालुक्यात अवैध व्यवसाय जुगार वाहतूक नियमभंग आणि

गुन्हेगारी प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची

भावना वाढीस लागली आहे.
विशेष म्हणजे गोपनीय माहितीचे अचूक नियोजन

तातडीची कारवाई आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी यामुळे सासवड पोलिसांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. मटका अड्ड्यावर टाकलेल्या या यशस्वी

छाप्यामुळे पुन्हा एकदा सासवड पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील आपली शून्य-सहनशीलता भूमिका अधोरेखित केली असून

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या नेतृत्वाचे पुरंदर तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!