The Maharashtra News

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक

गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २१) रात्री घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याने त्याच्याविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार विकास जगताप (रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) हे रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून पुणे–सासवड मार्गाने प्रवास करीत होते

ढुमेवाडी हद्दीत साई अँग्रो हायटेक नर्सरीसमोर आले असता, मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या फॉरच्यूनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली

धडकेमुळे ओंकार जगताप गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर फॉरच्यूनरचालकाने जखमी व्यक्तीला मदत न करता घटनास्थळावरून वाहनासह पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे

या प्रकरणी ऋषीकेश विकास जगताप यांनी सासवड

पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फॉरच्यूनर (एमएच १२ एक्सक्यू २५०९) चालकाविरुद्ध बुधवारी (ता. २२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी

वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे तपास सुरू केला असून पसार चालकाचा शोध घेतला जात आहे.

The post ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा appeared first on The Maharashtra News.

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा; आरोपींकडून गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या सासवड

पथकासह राजगड पोलिसांना यश आले आहे. २००३ मध्ये झालेल्या जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणी पोलिसांनी चौघांना जेरबंद केले आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी रात्री १०.२० वाजण्यापूर्वी शिंदेवाडी गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याच्या पुढे हॉटेल आमराईजवळ रस्त्याच्या कडेला संजय बाबूराव कडू-देशमुख आढळून आले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर, तोंडावर व हातावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला होता. याप्रकरणी

गौरव चंद्रकांत झेंडे (वय ३१, व्यवसाय भाजीपाला विक्री रा. पुणे) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) तसेच शस्त्र अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

खूनप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सासवड पथक आणि राजगड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

तांत्रिक तपासातून मंथन दिनेश वैद्य (रा. सदाशिव पेठ, जोशीवाडा, पुणे) आणि सौरभ सागर परदेशी (रा. सदाशिव पेठ, जोशीवाडा, पुणे) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन्ही आरोपींना १४ जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, या गुन्ह्यात मिझान गॅसउद्दीन शेख (रा. पर्वतीदर्शन, पुणे) आणि संदीप बाबुलाल कोरी (रा. पर्वतीदर्शन, स्वारगेट, पुणे) यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार दोघांनाही ताब्यात घेण्यात आले

पोलिस तपासानुसार, आरोपी मंथन दिनेश वैद्य याचे वडील दिनेश वैद्य यांचा २००३ मध्ये मृत संजय कडू-देशमुख यांनी खून केला होता. या जुन्या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी सूडबुद्धीने संजय कडू-देशमुख यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे

दरम्यान, आरोपी संदीप बाबुलाल कोरी याच्याकडून एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार विशाल दिवाणजी भोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिस पथकाची कामगिरी

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, राजगड

पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव, सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले, पोलिस उपनिरीक्षक युवराज धोंडे तसेच सहायक फौजदार संतोष तोडकर, किरण बर्काले, पोलिस हवालदार राजू मोमीन, संतोष भापकर

विशाल भोरडे, निलेश राणे, अडवाल, नाना मदने

गायकवाड, मयूर निंबाळकर, राजेंद्र मुंढे, प्रधान कोंढाळकर, पोलिस नाईक मेस्त्री, पोलिस कॉन्स्टेबल भालेराव, शिंदे, नलावडे व इतर अधिकारी-अंमलदारांच्या पथकाने केली.

The post २३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा; आरोपींकडून गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त appeared first on The Maharashtra News.

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने केली चोरी; जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज

जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात

महिलेने चोरून नेल्याची घटना रविवार (दि. १९) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला

असून, याप्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्वाती अनिल नलवडे (वय ४२, रा. वाडे, ता. जि. सातारा) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नलवडे या रविवार

दुपारी श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेत असताना गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या दागिन्यात सोन्याची साखळी व त्यास पॅन्डल असून, त्याचे वजन सुमारे सव्वा तोळे आहे. या सोन्याच्या मिनी गंठणाची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर

पोलिसांकडून मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून, चोरी करणाऱ्या संशयित महिलेचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

जेजुरी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक दर्शनासाठी येत असतात. गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांकडून भाविकांना लक्ष्य केले

जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मौल्यवान दागिने व वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. तसेच परिसरात एखाद्या

अनोळखी व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास तातडीने जेजुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार नांदे करीत आहेत.

The post जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास  गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने केली चोरी; जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल appeared first on The Maharashtra News.

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा; पोलिसांच्या तत्पर कारवाईत चार आरोपी ताब्यात, इतरांचा शोध सुरू
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी

रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार, दि. १९ जुलै रोजी घडला. आरोपींनी कार्यालयात तोडफोड करून कोयता, पिस्तुल व लाकडी दांडक्यांनी दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी सात जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सतीश शंकर गायकवाड (वय ३६, व्यवसाय—खरेदी-विक्री, रा. भिवडी, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिषेक बाळासो बोरकर (रा. नारायणपूर), वेदांत कटके (रा. भिवरी), निखील कामठे, शुभम बडदे (रा. कोडीत), ज्ञानेश म्हेत्रे, नानजी उर्फ तुकाराम बडदे (रा. कोडीत) आणि सुरज जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सासवड हद्दीतील बाळासाहेब भिंताडे यांच्या श्रीगणेश कार्यालयात फिर्यादी, त्यांचे भागीदार दिलीप भिंताडे व अन्य व्यक्ती जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासंदर्भात बसले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. अलका जगताप यांची जमीन घेतल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या भागीदाराला धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे

‘ही जमीन तुम्हाला द्यायची नाही. जास्त शहाणपणा करू नका, नाहीतर तुम्हाला इथेच गोळ्या घालतो. त्या जागेवर जायचे असेल तर आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी अभिषेक बोरकर याने हातातील बंदूक टेबलच्या काचेवर आपटून काच फोडल्याचे, तर वेदांत कटके याने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी मागे सरकल्याने हा वार चुकल्याचे पोलिसांनी सांगितले

दरम्यान, नानजी बडदे याने फिर्यादीच्या डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी कार्यालयात तोडफोड करून दहशत निर्माण केली. कार्यालयाबाहेर आल्यानंतर कोयते व लाकडी दांडके हवेत फिरवत दहशत निर्माण केल्याने परिसरातील दुकानदारांनी दुकानांचे शटर बंद केले, तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर फिर्यादी कसाबसा आरोपींच्या तावडीतून सुटून सासवड पोलीस ठाण्यात पोहोचला

पोलिसांची तत्काळ कारवाई; चार आरोपी ताब्यात

घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी तातडीने तीन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी बोपदेव रोडच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. आरोपी हिवरे गाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांना पाहताच काही आरोपी उसाच्या शेताच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी पाठलाग करून

कोडीत गावच्या परिसरातून वेदांत कटके, निखील कामठे, शुभम बडदे आणि ज्ञानेश म्हेत्रे या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

घटनेनंतर आरोपी काळ्या रंगाच्या थार वाहनातून तसेच हुंदाई आय-२० कारमधून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांसह भारतीय शस्त्र अधिनियम व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करीत असून, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

अनेक आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही आरोपींवर सासवड, जेजुरी, फलटण, येरवडा व सोलापूर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. त्यामध्ये खूनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, धमकी, शस्त्र कायदा तसेच दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

“घटनेची माहिती मिळताच काही क्षणांत तीन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. यातील अनेक आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील काळातही अशा गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.

The post जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा; पोलिसांच्या तत्पर कारवाईत चार आरोपी ताब्यात, इतरांचा शोध सुरू appeared first on The Maharashtra News.

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत दोन भामट्यांनी केला विश्वासघात जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल ..
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या

दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार (दि. १८ जुलै) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात दोन अज्ञात

व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुसुम प्रकाश भुजबळ (वय ६५, रा. जेजुरी, विद्यानगर, मूळ रा. दौंडज, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुम भुजबळ या जेजुरी गावच्या हद्दीत

शिवानंद हॉटेलजवळ प्रकाश झगडे यांच्या मालकीची टपरी चालवितात. त्या टपरीवर बसलेल्या असताना दोन अनोळखी इसम तेथे आले. परिसरात सोन्याचे दागिने चोरणारे लोक फिरत असल्याचे सांगून त्यांनी भुजबळ यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, तुमचे सोन्याचे दागिने

रुमालात गुंडाळून देतो असे सांगत या दोघांनी हातचलाखीने भुजबळ यांच्या कानातील सोन्याची फुले व गळ्यातील सोन्याची पोत काढून घेतली. त्यानंतर सोन्याचे दागिने असल्याचा भास निर्माण करून रिकामा रुमाल गुंडाळून त्यांच्या हातात दिला आणि तेथून पसार झाले

काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भुजबळ यांनी पोलिसांत धाव घेतली. चोरून नेलेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे २४ हजार रुपये किमतीची ४ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले आणि १८ हजार रुपये

किमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल

करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मपोसई पवार करीत आहेत

The post जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत दोन भामट्यांनी केला विश्वासघात जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल .. appeared first on The Maharashtra News.

समाधीवाडा परिसरात उघड्या गटारी दुर्घटनेची शक्यता गटारींवर तातडीने झाकणे बसविण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज सासवड शहरातील समाधीवाडा परिसरात गटारी उघड्या पडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या उघड्या गटारींमुळे

मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून  सासवड नगरपालिकेने तातडीने पाहणी करून गटारींवर झाकणे बसवावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

समाधीवाडा परिसरात नागरिकांची तसेच लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, काही ठिकाणी गटारींची झाकणे तुटलेली अथवा गायब झाल्याने गटारी उघड्या पडल्या आहेत. रात्रीच्या वेळी या उघड्या गटारी

सहज लक्षात येत नसल्याने पादचारी, दुचाकीस्वार तसेच लहान मुलांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

पावसाळ्यात या गटारींमध्ये पाणी साचल्यास उघड्या गटारींचा अंदाज येत नसल्याने दुर्घटनेची शक्यता अधिक वाढते. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची भावना आहे

सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समाधीवाडा परिसरातील उघड्या गटारींची पाहणी करून तातडीने गटारींवर मजबूत झाकणे बसविण्याच्या सूचना द्याव्यात

अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच शहरातील इतर भागांमध्येही अशा प्रकारे उघड्या गटारी आहेत का, याची पाहणी करून धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे

दुर्घटना घडण्याची वाट न पाहता नगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून उघड्या गटारींवर झाकणे बसवावीत, अशी मागणी समाधीवाडा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

The post समाधीवाडा परिसरात उघड्या गटारी दुर्घटनेची शक्यता गटारींवर तातडीने झाकणे बसविण्याची नागरिकांची मागणी appeared first on The Maharashtra News.

जेजुरीत सेफ्टी टँकमध्ये बुडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू घरातून बेपत्ता झाल्यानंतर शोधमोहीम दवणेमळा परिसरातील हृदयद्रावक घटना
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील दवणेमळा परिसरात सेफ्टी टँकमध्ये बुडून दीड

वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिव अविनाश हितापूर (वय १ वर्षे ६ महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिव हा चिमुकला सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाला

त्यानंतर कुटुंबीय व शेजाऱ्यांनी परिसरात त्याचा शोध सुरू केला. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही तो आढळून न आल्याने जेजुरी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू असताना घराजवळील सेफ्टी टँकमधील पाण्यात बुडबुडे दिसून आल्याने संशय आला. त्यानंतर टँकमधील पाणी काढण्यात आले असता चिमुकला त्यामध्ये आढळून आला.

कुटुंबीयांनी त्याला तातडीने जेजुरी येथील आयसीयू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पुढील तपास जेजुरी पोलीस

करीत आहेत. चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूने हितापूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

The post जेजुरीत सेफ्टी टँकमध्ये बुडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू घरातून बेपत्ता झाल्यानंतर शोधमोहीम दवणेमळा परिसरातील हृदयद्रावक घटना appeared first on The Maharashtra News.

खंडोबानगरमध्ये टोळक्याची दहशत तरुणावर लोखंडी रॉड दगड व लाकडी दांडक्याने हल्ला मी इथला भाई आहे म्हणत दहशत निर्माण केल्याचा आरोप १२ जणांसह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध सासवड पोलिसांत गुन्हा दाखल
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज : सासवड शहरातील खंडोबानगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला अडवून लोखंडी रॉड, दगड व लाकडी दांडक्याने

मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी सासवड पोलिसांनी १२ जणांसह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शुभम यल्लापा गायकवाड (वय २४, रा. तारादत्त पश्चिम, सासवड) यांनी सासवड पोलिसांत फिर्याद दिली

आहे. त्यानुसार विठ्ठल विजय खोमणे, राम राठोड, गणेश पवार, जितेंद्र ठोकळे, आर्यन सोळंकी, विरु साळंकी, श्रीनाथ खोमणे, समर्थ खोमणे, गुड्या शेलार, विकास मंडले, दत्ता शेलार, चिक्या भोंडे तसेच चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम गायकवाड हे शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटारसायकलवरून सोपानकाका मंदिर ते हाडको रोडमार्गे

जात होते. कब्रस्तानासमोरील अंबाबाई मंदिर परिसरात विठ्ठल खोमणे हा लोखंडी रॉड घेऊन त्यांच्या मोटारसायकलसमोर आडवा आला. गायकवाड यांनी वाहन थांबविल्यानंतर गणेश पवार याने पाठीमागून येऊन त्यांचा गळा आवळल्याचा आरोप आहे

‘तू या रस्त्याने का आला?’ असे म्हणत शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल खोमणे याने लोखंडी रॉडने गायकवाड यांच्या डोक्यात मारल्याने दुखापत झाली, तर विरु साळंकी याने दगडाने पोटात मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच विकास मंडले याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे

दरम्यान, इतर आरोपींनी हातापायांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण केली. ‘मी इथला भाई आहे, आज तुला इथले कोण सोडवते ते बघतो

तुला सोडवण्यासाठी येणाऱ्यांनाही सोडणार नाही,’ अशी धमकी देत लोखंडी रॉड हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे

या प्रकारामुळे परिसरातील नागरिक घाबरून घरात पळाले व काहींनी घरांना आतून कड्या लावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच फिर्यादी तेथून पळून जात असताना पोलिसांत तक्रार केल्यास ‘शंभर टक्के खल्लास करून टाकीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे

या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये तसेच फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम २०१३ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत. सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून आरोपींचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

The post खंडोबानगरमध्ये टोळक्याची दहशत तरुणावर लोखंडी रॉड दगड व लाकडी दांडक्याने हल्ला मी इथला भाई आहे म्हणत दहशत निर्माण केल्याचा आरोप १२ जणांसह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध सासवड पोलिसांत गुन्हा दाखल appeared first on The Maharashtra News.

सासवड शहरातील पानटपऱ्यांवर विमल गुटख्याची लपूनछपून विक्री? नागरिकांकडून अन्न व औषध प्रशासनाकडे कारवाईची मागणी
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी असतानाही सासवड शहरातील काही पानटपऱ्यांवर विमल गुटख्याची लपूनछपून विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. उघडपणे विक्री न करता मागणी

करणाऱ्या ग्राहकांना गुप्तपणे गुटखा दिला जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही टपरीचालक ग्राहकांच्या ओळखीच्या आधारे किंवा संकेत मिळाल्यानंतरच गुटख्याची विक्री करतात. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे

गुटखा सेवनामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याने शासनाने त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करून विक्री होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी

अशी मागणी नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

सासवड शहरातील पानटपऱ्यांची अचानक तपासणी करून बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करावा

तसेच दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे

(टीप : ही बातमी नागरिकांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर आधारित आहे. संबंधित प्रशासनाकडून अधिकृत माहिती किंवा कारवाई झाल्यानंतर त्यानुसार पुढील वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.)

The post सासवड शहरातील पानटपऱ्यांवर विमल गुटख्याची लपूनछपून विक्री? नागरिकांकडून अन्न व औषध प्रशासनाकडे कारवाईची मागणी appeared first on The Maharashtra News.

अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची मदत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून जखमींवर मोफत उपचारांचे निर्देश
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात ३ वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर

काही जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी

ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

या अपघातातील मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमी वारकऱ्यांवर शासकीय खर्चाने संपूर्ण मोफत

उपचार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले

आहेत. शासन अपघातग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे

असून उपचारात कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली

The post अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची मदत  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून जखमींवर मोफत उपचारांचे निर्देश appeared first on The Maharashtra News.