Homeक्राईमजेजुरीत मुंबई राजधानी मटकावर पोलिसांचा छापा जुगार अड्डा उद्ध्वस्त

जेजुरीत मुंबई राजधानी मटकावर पोलिसांचा छापा जुगार अड्डा उद्ध्वस्त

प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज:

अवैध जुगार व्यवसायाविरोधात जेजुरी पोलिसांनी धडक कारवाई करत जेजुरी बाजारतळ परिसरात सुरू असलेला मुंबई राजधानी मटका जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 19 जून 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जेजुरी बाजारतळ परिसरात अवैधरित्या मटका जुगार सुरू

असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तातडीने छापा टाकण्यात आला. यावेळी परशुराम गंगाराम खोमणे (वय 32 रा. मावडी ता. पुरंदर, जि. पुणे) हा मुंबई

राजधानी मटका नावाचा जुगार खेळविताना रंगेहाथ आढळून आला.

कारवाईदरम्यान आरोपीकडून 1 हजार 200 रुपयांची रोख रक्कम, जुगाराच्या नोंदीसाठी वापरले जाणारे कोरे पुस्तक आणि बॉलपेन असा एकूण 1 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल

जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मारुती लालासो करडे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 160/2026 नुसार नोंद करण्यात आली आहे. या कारवाईची नोंद

दाखल अंमलदार व तपासी अंमलदार सहायक फौजदार पिंगळे यांनी केली असून कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली

जेजुरी परिसरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी उघडलेली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून मटका, जुगार

अवैध मद्यविक्री आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर

कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या कारवाईमुळे अवैध धंदे

चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कायद्याचा धाक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!