Homeताज्या घडामोडीपुरंदर तालुक्यातील आस्करवाडीत मध्यरात्री हुक्का बारवर पोलिसांचा छापा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल २५...

पुरंदर तालुक्यातील आस्करवाडीत मध्यरात्री हुक्का बारवर पोलिसांचा छापा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल २५ हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज सासवड, दि. २० जून २०२६  पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथे मध्यरात्री सुरू असलेल्या एका हुक्का बारवर सासवड पोलिसांनी धाड टाकून अवैधरित्या ग्राहकांना हुक्का पुरवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत हुक्का साहित्य

तंबाखुजन्य पदार्थ आणि रोख रक्कम असा एकूण २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० जून २०२६ रोजी पहाटे १२.३५ वाजण्याच्या सुमारास मौजे आस्करवाडी

(ता. पुरंदर, जि. पुणे) येथील द वॉटर पाईप हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का बार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सासवड पोलिसांनी छापा टाकला असता ग्राहकांना धूम्रपानासाठी हुक्का पुरवून व्यवसाय

सुरू असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी शुभम महेश ढमे (वय २९, सध्या रा. कदम प्लाझा भारती विद्यापीठ कात्रज, पुणे, मूळ रा. कसबा

बारामती) आणि मिनहाजुल जाहीदुल इस्लाम (वय २४ सध्या रा. द वॉटर पाईप हॉटेल, आस्करवाडी, मूळ रा. दक्षिण २४ परगणा, पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे

कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच काचेचे हुक्का पॉट

विविध कंपन्यांच्या फ्लेवरयुक्त तंबाखुजन्य पदार्थांचे नऊ डबे, पाच मातीच्या चिलीम, फिल्टर पाईपचे पॅकेट पाच रबरी हुक्का पाईप तसेच ३ हजार रुपयांची रोख रक्कम

जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २५,८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले

या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७४/२०२६ नुसार सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ व २१-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश किवळे यांनी फिर्याद दिली असून गुन्ह्याची नोंद दि. २० जून २०२६ रोजी पहाटे ४.०३ वाजता करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार हाके करीत आहेत.

स्थानिक परिसरात हुक्का बारविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, युवकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अशा

बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!