Homeक्राईमसासवड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ८ जणांवर गुन्हा दाखल ३.८१ लाखांचा...

सासवड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ८ जणांवर गुन्हा दाखल ३.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज :सासवड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ८ जणांवर गुन्हा दाखल, ३.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

सासवड, दि. १९ जून २०२६ : सासवड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे जुना कोडीत रोड परिसरातील सिद्धेश्वर तलावाजवळील शेतात सुरू असलेल्या अवैध जुगार

अड्ड्यावर धाड टाकून ८ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ८१ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई किरण हनुमंत तुपे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मौजे सासवड येथील जुना कोडीत रोड परिसरात सिद्धेश्वर मंदिर रोडलगत तलावाच्या खालील बाजूस असलेल्या मोकळ्या

शेतजमिनीत काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय

पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंचांसह छापा टाकला.

सायंकाळी सुमारे ५.३० वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत आठ जण गोलाकार बसून तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना जागीच ताब्यात घेतले. आरोपींकडून १ लाख ४८ हजार ४१० रुपये रोख रक्कम, २ लाख ३३ हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल फोन तसेच १६० रुपये किमतीचे ८ पत्त्यांचे कॅट जप्त करण्यात आले.

या प्रकरणातील आरोपींमध्ये भरत बबन मोडक (रा. वडकी), मंगेश रमेश खपर्डे (रा. उरुळी कांचन), पुरुषोत्तम गणपत जाधव (रा. सासवड), चंद्रकांत शंकर भिंताडे (रा. भिवडी), रतन आप्पा बडधे (रा. कोडीत), दत्तात्रय साहेबराव वायकर (रा. हंडेवाडी), निलेश बाळासाहेब जगताप (रा. सासवड)

आणि निरंजन संभाजी गायकवाड (रा. वडकी) यांचा समावेश आहे.

जप्त केलेला मुद्देमाल पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत. या कारवाईसाठी उपविभागीय पोलीस

अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे तसेच सासवड पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला

अवैध जुगार व इतर बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!