Homeताज्या बातम्यासासवड शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ अनेकांचे कुटुंब होत आहेत...

सासवड शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ अनेकांचे कुटुंब होत आहेत उध्वस्त..

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज

गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत सासवड शहरात अवैध धंद्यात मोठ्या

प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे  जाणून बुजून दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पाणठेला चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात दारूविक्री जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा

चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच दारूचा व्यवसाय

उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. घरून पाहिजे तेवढा पॉकेटमनी मिळू शकत नाही, घरून मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये तरूणांच्या गरजा भागू शकत नाहीत़, यावर तरुणांनी उपाय शोधला असून, पैसा लावून जादा पैसा कमावण्यात तरूण लागले आहेत चक्रीवर तरूणांना सव्वा रूपयात

शंभर रूपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून मटक्याचे  गणित मांडल्या जात आहे. मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत आहे सासवड

पोलिस स्टेशन ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम अवैध व्यवसाय सुरू आहे. मात्र असे असतानाही या पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे

आता पुणे पोलिस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष
द्यावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!