प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तरटी मळा परिसरात जमिनीच्या वादातून पुतण्या आणि काकावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना
उघडकीस आली आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी एका कुटुंबातील नऊ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पाच पुरुष आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधाकर शिवाजी जगताप (वय 65, व्यवसाय शेती, रा. सासवड ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार, ही घटना 1 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास मौजे तरटी मळा येथील गट क्रमांक 97/26 व 97/09 या शेतजमिनीत घडली.
तक्रारीनुसार अभिषेक जगताप याने फिर्यादी सुधाकर जगताप व त्यांचा पुतण्या कुणाल यांना जीवे ठार
मारण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर अंगावर घालून जखमी केले. त्याचवेळी कृष्णकांत जगताप, लक्ष्मीकांत जगताप, उदय जगताप, प्रसाद जगताप, धनराज जगताप तसेच मनीषा जगताप, जयश्री जगताप आणि संध्या जगताप यांनी
संगनमत करून अभिषेक जगताप याला त्या दोघांना जिवंत ठेवू नको असे सांगून चिथावणी दिली. तसेच सर्वांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या पुतण्यावर दगडफेक करून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे
या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 300/2026 दाखल करण्यात आला असून संशयित अभिषेक जगताप, कृष्णकांत जगताप, लक्ष्मीकांत जगताप, उदय जगताप, प्रसाद जगताप, धनराज जगताप
मनीषा जगताप, जयश्री जगताप आणि संध्या जगताप या नऊ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील पाच पुरुष आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत. गुन्ह्याची नोंद
पोलीस अंमलदार पाटील यांनी केली असून, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार शेतजमिनीच्या मालकी व ताब्याच्या वादातून हा हिंसक प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, तपासानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















