Homeक्राईम28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस...

28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची धडक कारवाई….

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज

28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची सर्वात मोठी  धडक कारवाई

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक १८ मे रोजी

मांडकी ता.पुरंदर येथे छापा टाकून सुमारे २८ लाख रूपयांचा चंदनसाठा जप्त केलेला आहे.
पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांचे

आदेशाने दहशतवाद विरोधी शाखेचे पथक सासवड, जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत वेशांतर करून रेकॉर्डवरील संशयित आरोपीचा शोध घेताना वाल्हे येथे सदर पथकास एका खबऱ्यामार्फत, मांडकी, पाटील वस्ती ता.पुरंदर जि.पुणे येथे विलास भोसले यांचे शेतात मोठ्या प्रमाणात चोरीचे

चंदनाचा साठा लपवून ठेवला असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीवरून जेजुरी पोलीस स्टेशन कडील स्टाफ यांना मदतीसाठी घेऊन मांडकी येथे विलास रावजी भोसले यांचे शेतात जावून शोध घेतला असता तेथे हिरवे कापडाच्या खाली लपवून ठेवलेले ५६०

किलो वजनाचे चंदनाचे कापून ठेवलेले लाकडी ओंडके तसेच एक झाडे कापण्याचा बॅटरीवर चालणारा कटर व दोन लोखंडी ड्रील असा एकूण किंमत रुपये २८,०५,२००/- (अठ्ठावीस लाख पाच हजार दोनशे) चा माल मिळून आला. सदर ठिकाणी अनधिकृतपणे चोरून आणलेला विक्रीचे उद्देशाने ठेवलेला चंदनाचा साठा

पोलिसांनी जप्त केला. शेतीमालक विलास रावजी भोसले यांच्याकडे चौकशी केली सदरचे चंदन हे त्यांचा भाचा प्रतिक प्रमोद खुंटे रा.मांडकी, पाटीलवस्ती ता. पुरंदर जि.पुणे याने ठेवले असल्याचे सांगितले. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. याबाबत निष्पन्न आरोपी

प्रतिक प्रमोद खुंटे याचेवर जेजुरी पोलीस स्टेशनला बी.एन.एस. कलम ३०३(२), भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम २६, ४१, ४२ सह महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९८८ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल

करून कारवाई करण्यात आलेली असून पुढील अधिक तपास चालू आहे.
गुन्ह्यातील आरोपी प्रतिक खुंटे हा रेकॉर्डवरील सराईत

गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सातारा जिल्ह्यात जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर कामगिरी ही पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल व बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार

जेजुरी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस

हवालदार निलेश कदम, रविंद्र जाधव, पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक व जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांचे पथकाने केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!