प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज सासवड, ता. २४ : सासवड शहरातील नागरिकांना गुरुवारी (दि. २५ जून २०२६) तब्बल सहा तास वीजपुरवठा खंडित राहणार असल्याने विविध गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे.
महावितरणकडून विद्युत यंत्रणा, वीजवाहिन्या आणि उपकेंद्रांच्या देखभाल व दुरुस्तीची अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येणार असल्याने हा नियोजित वीजबंद ठेवण्यात आला आहे.
महावितरणच्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत संपूर्ण सासवड शहरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील वाढता
वीजभार, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरळीत व सुरक्षित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
वीजपुरवठा बंद राहणार असल्यामुळे घरगुती ग्राहक, व्यापारी, लघुउद्योग, कार्यालये तसेच विविध सेवा क्षेत्रांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषत
पाणीपुरवठा, इंटरनेट सेवा, बँकिंग व्यवहार आणि वीजेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिक कामांमध्ये काही प्रमाणात अडथळे निर्माण होऊ शकतात.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















