Homeमहत्त्वाचेपालखी मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी ११ ते १८ जुलैदरम्यान...

पालखी मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी ११ ते १८ जुलैदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन

प्रतिनिधी द महाराष्ट्र

 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी  पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून होणार असून

ग्रामीण भागातील बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर ११ ते १८ जुलैदरम्यान विविध मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून १३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणेहून सासवडकडे दिवेघाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या कालावधीत पुण्याकडून येणाऱ्या वाहनांनी खडी मशीन चौक–

कात्रज–कापूरहोळ मार्गाचा वापर करावा. तर सासवडकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक गराडे–खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.

१३ जुलै पहाटे २ वाजल्यापासून १४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत सासवड-जेजुरी-वाल्हे-निरा मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणेहून सासवड, जेजुरी, वाल्हे आणि निराकडे जाणाऱ्या तसेच नीराहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी–पारगाव मेमाणे–सुपे–मोरगाव–निरा या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

१५ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाल्हे ते लोणंद या टप्प्यात पालखी मुक्काम असल्याने पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-निरा मार्गावरील वाहतूक सासवड–जेजुरी–मोरगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

तसेच १५ ते १८ जुलै या कालावधीत लोणंद–फलटण मार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे

फलटण व लोणंद येथून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी शिरवळ मार्गाचा वापर करावा. त्याचप्रमाणे पुणेहून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतूकही शिरवळ मार्गे वळविण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक सहभागी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी

पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!