प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज जेजुरी पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तांबे चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत दोन
आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले सुमारे १४ किलो तांबे जप्त करण्यात आले असून आणखी तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे
जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३४(२) व ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला
तपासादरम्यान संदीप पांडुरंग मेमाने (वय ३६, रा. जेजुरी, ता. पुरंदर) आणि शंकर अण्णा पवार (वय ३४, रा. जेजुरी, ता. पुरंदर) या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. या गुन्ह्यात त्यांच्यासोबत आणखी तीन साथीदार सहभागी असल्याची माहितीही समोर आली आहे
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना २४ जून २०२६ रोजी जेजुरी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान
१६ जून २०२६ रोजी चोरीस गेलेले १४ किलो तांबे पोलिसांनी जप्त केले असून १७ जून रोजी झालेल्या आणखी एका चोरीच्या घटनेतील मालाचा तपास सुरू आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक विविध ठिकाणी तपास करत आहे
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष तोडकर, पोलीस हवालदार महेश खरात विशाल भोरडे आणि अक्षय यादव यांनी केली
तर तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस हवालदार राजू मोमीन आणि अतुल डेरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले
सीसीटीव्ही तंत्रज्ञान, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या प्रभावी वापरामुळे जेजुरी पोलिसांनी हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केल्याने त्यांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















