Homeक्राईमदिवे घाट व सासवड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयते नाचवणाऱ्या...

दिवे घाट व सासवड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयते नाचवणाऱ्या बुलेटस्वारांवर अखेर गुन्हा दाखल पोलिसांनी भर बाजार पेठेतून ढिंड काढावी नागरिकांची मागणी

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज :

दिवे घाट, पालखी महामार्ग बायपास आणि सासवड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयते नाचवत

गाड्यांचे सायलेन्सर फटाक्यांसारखे वाजवत आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत दहशत माजवणाऱ्या ४० ते ५० अज्ञात बुलेट व दुचाकीस्वारांवर सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या

हुल्लडबाजांच्या दहशतीमुळे पालखी महामार्गावरील चहा व स्नॅक्स चालकांनी आपली दुकाने धास्तीने बंद केली होती.
पोलीसां कडून
मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे २०२६ च्या रात्री सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सागर कोरडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे हे दिवे घाट ते

सासवड परिसरात पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, पालखी महामार्ग बायपासवर ४० ते ५० बुलेटस्वार आणि इतर दुचाकीस्वारांनी बेकायदेशीर जमाव जमवला असून, ते

हातामध्ये कोयते घेऊन आणि गाड्यांचे कर्कश आवाज काढून दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, पोलिसांना पाहताच हे हुल्लडबाज अंधाराचा फायदा घेऊन भरधाव वेगाने सासवडच्या अंतर्गत रस्त्यांनी पळून गेले

पोलिसांनी महामार्गावरील चहा व स्नॅक्सच्या गाड्यांकडे चौकशी केली असता, या टोळक्याच्या दहशतीमुळे त्यांनी आपली दुकाने बंद केल्याचे समोर आले.

१४ मे रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये हे अज्ञात बुलेटस्वार मध्यरात्रीच्या सुमारास दिवे घाटात हातामध्ये कोयते हवेत फिरवताना आणि बुलेट रेस करून सायलेन्सरमधून फटाक्यांसारखे आवाज

काढताना दिसत होते. पेट्रोलिंग दरम्यान पळून गेलेले बुलेटस्वार हेच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सागर कोरडे यांनी स्वतः सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांमार्फत कडक पावले उचलण्यात आली आहेत

• भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३: कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, २८१, २८५
• महाराष्ट्र पोलीस कायदा (१९५१): कलम ११०, ११२

११७, १३५
• आर्म्स ॲक्ट (शस्त्र कायदा): कलम ४(२५)
• मोटार वाहन कायदा: कलम १८४ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक (मपोसई) पाटील करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची धडक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज 28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची सर्वात मोठी  धडक कारवाई पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक...

मद्यधुंद कार चालकाची दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दोन...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज मद्यधुंद कारचालकांने दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत फिर्यादी - प्रकाश राजाराम काकडे वय...

शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निवड

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील  शिक्षक शिवहार लहाने यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक...

द. महाराष्ट्र न्यूज इफेक्ट वाघीरे महाविद्यालयासमोर अखेर प्रशासनाने स्पीडब्रेकर बसविला

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :द. महाराष्ट्र न्यूज इफेक्ट वाघीरे महाविद्यालयासमोर अखेर प्रशासनाने स्पीडब्रेकर बसविला सासवडून बापदेव मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या या रोड शेजारी   शाळा आहे येथून अनेक...

error: Content is protected !!