Homeताज्या घडामोडीभररस्त्यात वाहने लावून रहदारीस अडथळा सासवड पोलिसांची धडक कारवाई दोन जणांवर गुन्हे

भररस्त्यात वाहने लावून रहदारीस अडथळा सासवड पोलिसांची धडक कारवाई दोन जणांवर गुन्हे

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: सासवड, दि. 20 जून 2026 : रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात सासवड पोलिसांनी

धडक मोहीम सुरू केली असून, भररस्त्यात वाहने उभी करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाहतूक शिस्तीबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे

सासवड शहर आणि परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान कोंढवा-सासवड रोडवरील हॉटेल मोहीनी समोर आणि सासवड-बोपदेवघाट रोडवरील भोगळे वाईन्स समोर दोन चारचाकी वाहने धोकादायक

पद्धतीने उभी केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे

या प्रकरणी मयुर संदाम कुंभारकर आणि जयदीप बाळकृष्ण निगडे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं.का. कलम 285 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस हवालदार संतोष गोरख शिंदे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

विशेष म्हणजे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता थेट गुन्हे दाखल करण्याची भूमिका सासवड पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.

“रस्ते हे सर्वांसाठी आहेत, काहींच्या मनमानीसाठी नाहीत,” असा संदेश या कारवाईतून दिला जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे पुरंदर तालुक्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेचे

अनेक स्तरांतून स्वागत केले जात असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत

सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अतिशय सकारात्मक बदल दिसून येत आहे.सासवड मधील ट्रॅफिकचे समस्या,सासवड आणि परिसरातील अवैध व्यवसाय,तसेच बेशिस्त दुचाकी व चार चाकी नागरिकांना समज देणे असेल तसेच इतरही नागरिकांच्या विविध

समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने ते अग्रक्रमाने प्रयत्नशील आहेत. आणि हे अतिशय कौतुकास्पद आहे.त्यामुळे अशा प्रामाणिक,कडक शिस्तीच्या व गुन्हेगारांना कायद्याचा धाक

निर्माण करून सर्वसामान्यांच्या हिताचे संरक्षण करणाऱ्या

अधिकाऱ्याला नागरिकांनी सपोर्ट करणे गरजेचे आहे.असे पुरंदर मधील दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार

शिवदास शितोळे यांनी द महाराष्ट्र न्यूज सी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!