Homeक्राईमसासवडमध्ये मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सासवडमध्ये मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज : सासवड, ता. पुरंदर (दि. 18 जून 2026): सासवड पोलिसांनी मटका जुगाराविरोधात कारवाई करत दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक

अधिनियम कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण 2,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून सायंकाळी सुमारे 5.50 वाजण्याच्या सुमारास सासवड शहरातील

जेजुरी नाका परिसरात माने हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती कल्याण स्टार मटका नावाचा जुगार कागदी चिठ्ठ्यांच्या माध्यमातून चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सासवड पोलिसांनी छापा टाकला

या कारवाई दरम्यान सुरज विश्वास जाधव (वय 31 रा. इंदिरानगर, सासवड) आणि अशोक मारुती दळवी (वय 55, रा. इंदिरानगर, सासवड) हे दोघे वेगवेगळ्या ग्राहकांकडून मटक्याचे आकडे स्वीकारून त्यांची देवाणघेवाण करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच जुगाराशी संबंधित साहित्य जप्त केले

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बापुराव तात्याराम म्हेत्रे सासवड पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 270/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद 18 जून 2026 रोजी रात्री 8.44 वाजता करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास  पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत असून

कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अवैध जुगार व्यवसायाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनीदिला असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!