Homeताज्या बातम्यापत्रकार भवन स्लॅब भरणी समारंभ संपन्न पत्रकार भवन तालुक्याचा मानबिंदू ठरावा-...

पत्रकार भवन स्लॅब भरणी समारंभ संपन्न पत्रकार भवन तालुक्याचा मानबिंदू ठरावा- डॉ.अमोल हेंद्रे

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड (प्रतिनिधी):पत्रकार हे समाजाचा आरसा असतात. पुरंदर तालुक्यातील पत्रकारांच्या एकजुटीतून आदर्शवत अशी पत्रकार भवनाची इमारत उभी राहत आहे, ही आनंदाची बाब आहे.येत्या

काळात ही वास्तू उदयोन्मुख पत्रकार व समाजासाठी दिशादर्शक ठरत तालुक्यासाठी एक नवा मानबिंदू ठरेल असा विश्वास जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.अमोल हेंद्रे यांनी व्यक्त केला.
शिवरी(ता.पुरंदर)येथे शुक्रवार (ता.२४) रोजी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनाच्या दुसऱ्या स्लॅब भरणीचा कार्यक्रम डॉ. हेंद्रे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे होते.

याप्रसंगी गौरव कोलते,डॉ.सुमित काकडे,डॉ.नितीन माने,अॅड.सुनिल धिवार अमित झेंडे बी.एम.काळे,प्रकाश फाळके दत्ता भोंगळे,सुनिल लोणकर भरत निगडे,अमोल बनकर मंगेश गायकवाड,किशोर कुदळे समीर भुजबळ,मामा गायकवाड प्रविण नवले,राहुल शिंदे स्वप्निल कांबळे शिवदास शितोळे चंद्रकांत चौडकर निलेश भुजबळ राजेश काकडे  नवनाथ राणे आदींसह तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

गौरव कोलते म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी पत्रकारांच्या जिल्हा संघांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र तालुका स्तरावर पत्रकारांसाठी इमारती उपलब्ध नाहीत. ही अडचण ओळखून पुरंदर तालुक्यातील पत्रकारांनी हा अभिनव संकल्प हाती घेतला आहे. ही वास्तू इतर तालुक्यांतील पत्रकार संघांना प्रेरणादायी ठरेल. या कार्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासनही दिले.

सुदाम इंगळे म्हणाले की, मागील काळात राज्य शासनाच्या मदतीतून जिल्हा स्तरावर पत्रकार संघांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.मात्र, राज्य शासनाचा निधी तालुका स्तरीय संघांना मिळण्याची तरतूद नसल्यामुळे तो मिळवता आला नाही. राज्यात अनेक ठिकाणी तालुका संघांनी पत्रकार भवन उभारण्याचे प्रयत्न केले,मात्र काही कारणास्तव ती कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. मात्र पुरंदरमधील

पत्रकारांनी एकजुटीने सुरू केलेले हे अधुनिक व सुसज्ज पत्रकार भवन राज्यभरातील पत्रकार संघांसाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो.”
डॉ.सुमित काकडे म्हणाले की,आजचा हा ऐतिहासिक दिवस पुरंदर तालुक्यातील पत्रकारांसाठी अभिमानास्पद ठरला असून पत्रकार भवनाच्या उभारणीस प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे

पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी प्रास्ताविक केले. निलेश जगताप यांनी सुत्रसंचालन तर प्रकाश फाळके यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!