प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज :
जेजुरीतून एक धक्कादायक बातमी समोर येतीय …..
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथून एक धक्कादायक बातमी समोर येतीय
जेजुरी (ता. पुरंदर) – विद्यानगर परिसरातील एका १६ वर्षीय मुलाने घरातील अँगलला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १३ ऑगस्ट) सायंकाळी घडली.
पोलिसांकडून
मिळालेल्या माहितीनुसार, राजवीर शेखर पाले (वय १६) हा आपल्या आई-वडिलांसोबत विद्यानगर, जेजुरी येथे राहत
होता. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.
कुटुंबीयांनी दरवाजा तोडून त्याला खाली उतरवले आणि
तातडीने जेजुरी येथील खाजगी दवाखान्यात नेले. मात्र
उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे पथक
तातडीने घटनास्थळी दाखल झाले. असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक सर्जेराव पुजारी करीत आहेत.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















