प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : बोपगाव (ता. पुरंदर) येथे हॉर्न वाजवण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाला मारहाण करून दगडाने जखमी केल्याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण शिवाजी बालगुडे (वय 32, रा. मुर्टी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गोट्या उर्फ अक्षय संभाजी खेनट (रा. पिंपळे, ता. पुरंदर), गणेश नवनाथ कामथे आणि प्रसाद मारुती कामथे (दोघेही रा. चांबळी ता पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही घटना 6 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास बोपगाव गावच्या चौकातील कानिफनाथ
कमानीजवळ, सासवड-बोपगाव मार्गावर घडली. फिर्यादी हे मोटारसायकलवरून जात असताना हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांची मोटारसायकल आडवी
घालून अडवली. त्यानंतर तिघांनी मिळून हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तक्रारीनुसार संशयित आरोपी गोट्या उर्फ अक्षय खेनट याने हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केली
तसेच गणेश कामथे आणि प्रसाद कामथे यांनीही मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली
या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 260/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(1), 126, 352, 351(2), 351(3) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार होळकर करीत आहेत

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















