Homeताज्या बातम्यासासवड येथील अजय गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त म. ए. सो....

सासवड येथील अजय गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेने केले अथर्वशीर्ष पठण..

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :

म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी सासवड येथील श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाऊन या ठिकाणी अकरा वेळा अथर्वशीर्ष पठण केले. त्यानंतर सामुदायिक आरती झाली. विद्यार्थ्यांनी गणपतीची

गाणी म्हटली. या उपक्रमात इयत्ता तिसरी, चौथीचे ३५० विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. शाळेचा हा उपक्रम गेल्या चौदा वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे.

श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त मंडळाने वृंदावन चा सुंदर देखावा सादर केला आहे. वर्षभर मंडळाकडून विविध

सामाजिक उपक्रम घेतले जातात. गरजू महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी मदत केली जाते तसेच पानवडी येथे

गो शाळा सुरू केली आहे. बारामती विभागातून मंडळाला सामाजिक कार्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी दिली.

दरवर्षी गणपती उत्सवाच्या अगोदर विद्यार्थी शाळेत दररोज अथर्वशीर्ष म्हणण्याचा सराव करतात आणि सुस्पष्ट उच्चारासह विद्यार्थी अथर्वशीर्ष पाठांतर करतात. एवढेच

नव्हे तर शाळेतील विद्यार्थी आपल्या घराशेजारी राहणाऱ्या इतर शाळेतील विद्यार्थ्यांना देखील अथर्वशीर्ष म्हणायला शिकवतात. यामुळे इतर विद्यार्थ्यांचे देखील अथर्वशीर्ष

पाठांतर झाले आहे.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी, श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुख्याध्यापक शिक्षक यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, अजय गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रविण पवार नरेंद्र महाजन

माणिक शेंडकर, दिपक कांदळकर, नितीन ठोंबरे, स्वाती बोरावके, अश्विनी कदम, राणी गिरमे, राजगौरी जगताप

वृषाली राजपुरे, सविता काळे ,मंडळाचे कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे शाला समितीचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी कौतुक केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!