प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज सासवड शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक आणि सामान्य नागरिकांना सध्या झुंडीने भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांची दहशत आहे कारण
गेल्या काही वर्षापासून काही मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतलाय नगरपरिषद प्रशासन मात्र काहीच पावलं उचलताना दिसत नसल्याचे आरोप नागरिक करीत आहे नगरपरिषद प्रशासनाकडे अशी भटकी कुत्री
पकडण्यासाठी कोणतीही यंत्रणात उपलब्ध नसल्याने तेही हतबल झाले आहेत सासवड शहराच्या सरकारी तसेच
खाजगी रुग्णालयात लहान मुलांना उपचारासाठी दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे त्याला कारण ठरले मोकाट कुत्री आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सूळसुळाट शहरातील सर्वच भागात मोकाट कुत्र्यांनी लहान मोठे असे सर्वांनाच चावे घेतले आहेत एका वेळी चार ते पाच जणांना कुत्रे चावतात आणि प्रशासन यावर काहीच करत नाही नगर परिषदेकडे भटक्या मोकाट कुत्र्याबाबत नागरिकांकडून
अनेक वेळा तक्रारी दाखल झाले आहेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कोणी करायचा असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे अशी चावा घेणारी मोकाट कुत्री विद्यार्थ्यांना चावल्याने
त्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















