Homeक्राईमCRIME News:फलटणच्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश तीन आरोपी जेरबंद, जबरी चोरीचे तीन गुन्हे...

CRIME News:फलटणच्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश तीन आरोपी जेरबंद, जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस दोन दुचाकी व साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त ५.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पुणे ग्रामीण

पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी संयुक्त कारवाईत आंतरजिल्हा टोळीतील तीन सराईत आरोपींना अटक केली आहे.

आरोपींकडून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून दोन मोटारसायकली, साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार हा गुन्हा दाखल आहे. फिर्यादी राजकुमार विश्वनाथ हाके (वय ५८, रा. बधेनगर, कोंढवा, पुणे)

हे त्यांच्या मावस बहिणीसह पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथील काळुबाई मंदिराकडे जात असताना ३१ मे २०२६ रोजी तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून आरोपी दुचाकींवरून पसार झाले होते

या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून साक्षीदारांची चौकशी केली. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने आरोपी ज्या मार्गाने पळून गेले त्या मार्गावरील तब्बल ६५ किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून आरोपी दोन मोटारसायकलींचा वापर करून सासवड

लोणंद मार्गे फलटणच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने आरोपी बाळू ईश्वर माळी (वय ५२), रोहित शिवाजी ननवरे (वय २८) आणि दिलीप गोरख माळी (वय ४५), सर्व रा. फलटण, जि. सातारा यांचा शोध घेत ३० जून २०२६ रोजी फलटण येथून ताब्यात घेतले. चौकशीत

तिघांनी सासवड येथील जबरी चोरीची कबुली दिली.
सखोल चौकशीत आरोपींनी यवत पोलीस ठाणे आणि लोणावळा शहर पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीच्या आणखी दोन गुन्ह्यांचीही कबुली दिली. त्यामुळे या टोळीने केलेले एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत

आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पॅशन आणि सीडी डिलक्स या दोन मोटारसायकली तसेच सुमारे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

तपासात आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आरोपी बाळू ईश्वर माळी याच्यावर सातारा जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरीचे दोन गुन्हे, तर दिलीप गोरख माळी याच्यावर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत दरोडा व जबरी चोरीचे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक

संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, विनोद भोकरे, परमेश्वर गोडसे तसेच पोलीस अंमलदार सचिन घाडगे, संतोष तोडकर, महेश खरात, गुरुनाथ गायकवाड

विशाल भोरडे, अक्षय यादव, विकास कापरे, राहुल पवार प्रविण शेंडे आणि तुषार लोंढे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!