Homeताज्या बातम्याआरे बापरे::सासवडच्या या डोंगरावर जवळील परीसरात बिबट्याचे दर्शन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आरे बापरे::सासवडच्या या डोंगरावर जवळील परीसरात बिबट्याचे दर्शन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  बिबट्या आला रे”””सासवडला या डोंगरा जवळील परीसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सासवडला या डोंगराजवळील परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सोमवारी सायंकाळी झाले बिबट्याचे दर्शन

सासवड शहरा जवळील वाघडोंगर परिसरात सोमवारी (दि.८) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे

परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच सकाळ – सायंकाळ व्यायाम व फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाघडोंगर परिसर हा सासवड शहरातील नागरिकांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो. दररोज अनेक नागरिक सकाळी व सायंकाळी येथे फिरण्यासाठी

व्यायामासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र, सोमवारी बिबट्याचे थेट दर्शन झाल्याच्या घटनेनंतर या परिसरातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत होते. त्यातच बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झाली आहे. विशेषतः शेतकरी, महिला आणि लहान मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सासवड येथील नागरिक रोहिदास घारे यांनी सांगितले की आम्ही रोज सकाळी व्यायाम आणि फिरण्यासाठी वाघडोंगर परिसरात येत असतो. येथे प्रथमच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

झाले आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांच्या

सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात

दरम्यान, वाघडोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याने बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांचा अधिवास या भागात नैसर्गिकरीत्या असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून परिस्थितीचा

आढावा घेतला आहे. वन्यजीवांच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, एकटे फिरणे टाळावे आणि वन्य प्राण्यांच्या हालचाली आढळल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावधगिरी बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन

वाघडोंगर परिसरातील वनक्षेत्रामुळे बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांचा वावर अधूनमधून आढळू शकतो. त्यामुळे सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी केले आहे. वन्य

प्राण्यांचे दर्शन झाल्यास अथवा संशयास्पद हालचाली दिसून आल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असेही ढोले यांनी सांगितले. वनविभागाकडून परिसरावर

लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!