प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील मल्हार अॅक्वा या व्यावसायिक आस्थापनात वीजचोरी केल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा, २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीकांत मल्हारी गायकवाड (रा. भिवडी, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत महावितरणच्या बारामती भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रघुनाथ नाथ्याबा गोफणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार १० मार्च
२०२६ रोजी महावितरणच्या भरारी पथकाने संबंधित व्यावसायिक ठिकाणी वीजमीटर व वीजजोडणीची तपासणी केली. यावेळी पोलवरून येणाऱ्या इनकमिंग सर्व्हिस वायरमधून वीजमीटरपूर्वीच अनधिकृत टॅप घेऊन
२.५ चौ.मि.मी. निळ्या वायरच्या सहाय्याने थेट वीजपुरवठा करून वीजमीटरवर वापराची नोंद होणार नाही, अशी कायमस्वरूपी व्यवस्था केल्याचे निदर्शनास आले
तपासणीदरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून वीजमीटर, जोडणी व संपूर्ण ठिकाणाचे छायाचित्रण करण्यात आले. तसेच वीजचोरीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे तीन फूट लांबीची वायर जप्त करून सीलबंद
करण्यात आली.
महावितरणच्या नोंदीनुसार संबंधित ग्राहकाचा मंजूर वीजभार १ किलोवॅट असताना प्रत्यक्ष जोडलेला भार ३.६३ किलोवॅट आढळला. मागील १८ महिन्यांच्या तपासणीत
८,१६६ युनिटपैकी केवळ ३०७ युनिटचे बिल आकारण्यात आले असून उर्वरित ७,८६० युनिटच्या वापरामुळे सुमारे १ लाख ८१ हजार ६८६ रुपयांचे वीजचोरीचे मूल्यांकन करण्यात आले
या प्रकरणात संबंधित ग्राहकाने १३ मे २०२६ रोजी १ लाख ८३ हजार ५५० रुपये वीज बिलाची रक्कम भरल्याची नोंद आहे. मात्र, २० हजार रुपयांचे तडजोड शुल्क अद्याप
भरलेले नसल्याने महावितरणने कायदेशीर कारवाई करत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला
हा प्रकार २९ ऑगस्ट २०२४ ते १० मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचा संशय असून स्थळ तपासणी
अहवाल, पंचनामा, असेसमेंट शीट, वीजबिले, छायाचित्रे व जप्त मुद्देमाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधवर करीत आहेत.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















