प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज
शिक्षकांचे या तारखेला शाळा बंद आंदोलन होणार
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
दि. 25 शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी ) उत्तीर्ण करणे शिक्षकांना बंधनकारक करू नये , 15 मार्च 2024 चा संचमान्यता शासन आदेश रद्द करण्यात यावा. ऑनलाईन आणि अशैक्षणिक कामे बंद करावीत सर्व कर्मचाऱ्यांना
जुनी पेंशन योजना लागू करावी, शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी, वस्तीशाळा शिक्षकांना सर्व लाभ देत त्यांचा नियुक्ती दिनांक ग्राह्य धरावा. शिक्षणाचे कंत्राटीकरण थांबवावे , नवीन
सुधारित आश्वासित योजना लागू करावी. या आणि इतर मागण्यासाठी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही शासन अजिबात प्रतिसाद देत नाही. त्यामुळे राज्यभरात
शुक्रवारी 5 डिसेंबर ला शाळा बंद आंदोलन आणि प्रत्येक जिल्ह्यत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन काल देण्यात आले. मोर्चा नियोजन पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक
शिक्षक – शिक्षकेतर संघटना समन्वय समिती ची सभा काल पुण्यात पार पडली 5 डिसेंबरला पुणे जिल्हा , पुणे शहर पिंपरी चिंचवड येथील सर्व शाळा बंद जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
यावेळी शिक्षक संघांचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब मारणे , शिक्षक – शिक्षकेतर महामंडळाचे राज्य सरचिटणीस शिवाजी खांडेकर मुख्याध्यापक संघांचे राज्य सरचिटणीस नंदकुमार सागर , शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार
होळकर , केंद्रप्रमुख संघटना राज्य अध्यक्ष राजेंद्र जगताप म. न. पा. संघांचे राज्य अध्यक्ष सचिन डिंबळे , शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद गोरे, शिक्षक समिती चे जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप , जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल लोणकर , जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव
ढोबळे , उर्दू संघटनेचे मुश्ताक पटेल , राज्य शिक्षक सेनेचे सुनिल जगताप , रणजित बोत्रे , शिवाजी कामथे , के. एस
ढोमसे , जुनी पेन्शन संघटना – जितेंद्र फापाळे गोरख थोरात , पी. डी. शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















