प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड बापदेव घाट कोंढवा रोड उद्या सकाळी साडे सात वाजल्यापासून हिंदू जन आक्रोश मोर्चा मुळे बंद राहणार वाहन चालकांनी या पर्यायी
मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे
दिनांक: 08 एप्रिल 2026 बुधवारी
सासवड ते येवलेवाडी येथे सकल हिंदू समाज यांचेकडून “हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा होण्याची शक्यता असून वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते.
बोपदेव घाटा मार्ग सासवड जाणारा रस्ता सकाळी ७/oo पासुन आवश्यकतेनुसार तात्पुरता बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग:
खडीमशीन चौक → उंड्री चौक → मंतरवाडी फाटा → दिवे घाट → सासवड
वाहनचालकांसाठी सूचना:
पर्यायी मार्गाचा वापर करावा
वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे
शक्यतो गर्दीच्या वेळेत प्रवास टाळावा असे आवाहन
पोलीस उपायुक्त, कार्यालय वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या कडून करण्यात आले आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















