Homeक्राईमसासवडमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सासवडमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज सासवड शहरातील खंडोबा नगर झोपडपट्टी परिसरात जुन्या आर्थिक वादातून एका 23 वर्षीय तरुणावर कोयता व दगडाने जीवघेणा हल्ला

करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सासवड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सागर बबलू नाथू (वय 23, रा. खंडोबा नगर झोपडपट्टी, सासवड) यांनी

याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना 28 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 8.40 वाजण्याच्या सुमारास खंडोबा नगर येथील विराज किराणा स्टोअरसमोरील रस्त्यावर घडली.
तक्रारीनुसार, आरोपी पिंकी पांडुरंग पवार हिने फिर्यादीकडे

कोणतेही पैसे येणे नसतानाही उसने घेतलेले पैसे परत देण्याची मागणी करत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर महादेव खुडे व नंदिनी रोहन पवार यांनी दगडाने डोक्यावर व पोटावर मारहाण केली

दरम्यान, रोहन पांडुरंग पवार याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने बचावासाठी डावा हात पुढे केल्याने कोयत्याचा वार हाताच्या बोटांवर व तळव्यावर बसून गंभीर दुखापत झाली

तसेच सुरज विटकर (पूर्ण नाव माहित नाही) यानेही फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या कानामागील भागावर वार करून गंभीर जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर जखमीवर जनहितार्थ हॉस्पिटल, सासवड येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर सागर नाथू यांच्या

फिर्यादीवरून पिंकी पांडुरंग पवार, रोहन पांडुरंग पवार महादेव खुडे, नंदिनी रोहन पवार आणि सुरज विटकर (पूर्ण नाव माहित नाही) या पाच जणांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!